‘त्या’ तब्लिगींना जामीन परंतु निकाल लागेपर्यंत जिल्हाबंदी कायम !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,19 जून 2020 :   त्या २९ परदेशी तबलिगी नागरिकांना अहमदनगर व नेवासा कोर्टाने तब्बल दोन महिन्यानंतर जामीन दिला. मात्र जो पर्यंत या खटल्याचा निकाल लागत नाही, तोपर्यंत देश तर नाहीच पण अहमदनगर जिल्हा देखील सोडून जाता येणारं नसल्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अशी माहिती या नागरिकांचे वकील राजेंद्र शेलोत यांनी दिली. कोरोना सारख्या संसर्गजन्य रोगाचा वेग झपाट्याने वाढत असताना लॉकडाऊन काळातच नगर शहर, जामखेड तसेच नेवासा येथे २९ परदेशी तबलिगी नागरीक आढळून आले होते.

या संकटात परदेशी लोकं आढळून आल्याने त्यांची कोरोना तपासणी करण्यात केली असता तब्बल ६ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते, इतरांना क्वारंटाईन केले होते.

दरम्यान, कोरोनाच्या महामारीत परदेशी लोकं जिल्ह्यात आढळून आल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते, मात्र कोरोना बाधीत असलेले आणि क्वारंटाईन करण्यात आलेल्याचा रिपोर्ट चौदा दिवसानंतर निगेटिव्ह आल्याने त्यांना पोलिसांनी दि.१८ एप्रिल रोजी अटक केली होती.

त्यानंतर त्या परदेशी नागरिकांना तब्बल २ महिन्यानंतर आज जामीन मिळाला आहे. मात्र कोर्टाने दिलेला जामीन हा अटी शर्ती लावून दिलेला असून, यात महत्त्वाचे म्हणजे या प्रकरणाचा जो पर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत देश तर नाहीच पण अहमदनगर जिल्हा देखील सोडून जाता येणारं नसल्याचे आदेश देण्यात आले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment