पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्राचे वाटप करून शिवसेनेचा स्थापना दिवस साजरा !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 : केंद्रातील सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्राचे वाटप करून अकोल्यातील कळस बुद्रूक येथे शिवसेनेचा स्थापना दिवस शुक्रवारी साजरा करण्यात आला.

शिवसेनेच्या स्थापनेपासून भाजपबरोबर युती होती. आता काही कारणांमुळे युती तुटली असली, गावात आम्ही एकत्र आहोत.

या विधानसभा निवडणुकीत आम्ही भाजपचा प्रचार केला, असे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विनायक वाकचौरे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

शिवसेना स्थापना दिनानिमित्त शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन वाकचौरे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी भाजपचे तालुका सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे, रिपाइंचे राजेंद्र गवांदे उपस्थित होते.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment