विनापरवानगी तालुक्यात आल्याने या तालुक्यातील ११ जणांविरोधात गुन्हा दाखल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,21 जून 2020 : अहमदनगर : कोरोनाच्या काळात पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील विलगीकरण केंद्रात शासकीय कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता बेकायदेशीर दाखल झालेल्या ११ जणांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंबधीची फिर्यादी भाळवणी गावचे ग्रामविकास अधिकारी संपत राधुजी दातीर यांनी दिली असुन, याप्रकरणी सुनील एकनाथ भोसले, संगीता सुनील भोसले, मारुती दगडू भोसले, द्रौपदी मारुती भोसले, बाबासाहेब मारुती भोसले, सुनीता बाबासाहेब भोसले, साळूबाई सुरेश भोसले, संदीप सुरेश भोसले, नंदिनी सुरेश भोसले, सुहास सुरेश भोसले, पूजा सुहास भोसले (सर्व रा. भाळवणी, तालुका पारनेर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना दि. १३ जून रोजी ते दि. १५ जून या कालावधीत घडली असुन कोरोनाचा दुसरा रूग्ण भाळवणीत सापडल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. यासंबंधीची पोलिस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, यातील ११ आरोपी हे त्यांचे मुलांसह शासनाची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता मुंबई ते भाळवणी असा प्रवास करून आदेशाचे उल्लंघन करून कायद्याचा अवमान केला.असे फिर्यादीत नमूद केले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment