अहमदनगर जिल्ह्यात एकाच दिवशी आढळले कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण …

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,22 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यात रविवारी कोरोनाचे सर्वाधिक १८ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची एकूण संख्या ३०२ झाली आहे.

नगर शहरात ५ नवे रुग्ण आढळून आले. दिवसभरातील हा उच्चांक आहे. गेल्या साडेतीन महिन्यात जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण रविवारी आढळले.

नगर शहरातील झेंडीगेट येथील ५४ वर्षीय पुरुष, नालेगाव येथील ५८ वर्षीय महिला, तोफखाना भागातील ६२ वर्षीय महिला, सिद्धार्थनगरमधील ३५ वर्षीय पुरुष व रासनेनगरमधील ६२ वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे.

श्रीगोंदे शहरातील १८ वर्षीय युवक आणि ६५ वर्षीय पुरुषाला कोरोनाची बाधा झाली. श्रीगोंदे तालुक्यातील बेलवंडी येथील ३७ वर्षीय महिलाही बाधित आढळली.

अकोले तालुक्यातील कोतूळ येथील ४८ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. पारनेर तालुक्यातील गोरेगाव येथील ३० वर्षीय पुरुष, भोयरे पठार येथील २८ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment