नोकियाची धम्माल ऑफर; एका स्मार्टफोनवर दुसरा फ्री आणि बराच काही…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 :  सध्या अनेक मोबाईल कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि मार्केटमध्ये आले स्थान टिकून ठेवण्यासाठी धडपड करत आहेत. आता HMD Global ने आपल्या ग्राहकांसाठी व अनेकांना आकर्षित करण्यासाठी धमाकेदार ऑफर आणली आहे.

या ऑफर अंतर्गत नोकिया ७.२ (Nokia 7.2) स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर स्मार्टफोन केस फी मिळणार आहे. तसेच फोनसोबत नोकिया सी१ (Nokia C1) फोन फ्रीमध्ये दिला जात आहे.

सध्या ही ऑफर फिलिपिन्स ग्राहकांसाठी मर्यादित आहे. फिलिपिन्स मध्ये हा फोन १५,९९० पीएचपी म्हणजेच २८५ यूरो आहे. नोकिया ७.२ स्मार्टफोनमध्ये ६.३ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे.

हा स्मार्टफोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६६० प्रोसेसर दिला आहे. स्मार्टफोनमध्ये ६ जीबी रॅम दिली आहे.

फोनच्या बॅकला प्रायमरी कॅमेरा ४८ मेगापिक्सलचा दिला आहे. तसेच फोनमध्ये बॅकला ८ मेगापिक्सलचा आणि ५ मेगापिक्सलचा सेन्सर दिला आहे. फोनमध्ये 3,500 mAh बॅटरी दिली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews 

Leave a Comment