पंजाब अँड सिंध बँकेच्या 113 व्या स्थापना दिनानिमित्त ग्राहकांना वृक्षरोपांचे वाटप

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम ,27 जून 2020 :  राष्ट्रीयकृत बँकांमध्ये अग्रगण्य असलेल्या पंजाब अँड सिंध बँकेची स्थापना 24 जुन 1908 साली अमृतसर येथे झाली. केंद्र शासनाच्या विविध योजना समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचवून त्यांना आर्थिकदृष्टया सक्षम करण्यात बँक नेहमीच अग्रेसर असते.

याच बरोबर देशातील युवकांना सक्षम उद्योजक बनविण्यासाठी, स्वयंरोजगारातुन आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बँकेच्या विविध वित्तीय योजना कार्यान्वीत आहेत.

या माध्यमातून आज देशभरात अनेक युवा उद्योजक तयार झाले आहेत, असे प्रतिपादन बँकेचे वरिष्ठ अधिकारी संतोष चौधरी यांनी केले. पंजाब अ‍ॅण्ड सिंध बँकेच्या 113 व्या स्थापना दिनानिमित्त ग्राहकांना वृक्षरोपांचे वाटप करताना बँकेचे अधिकारी संतोष चौधरी.

समवेत कलम खिलवानी, नितीन राठौर, किशोर वेलूरकर, पूनम नारनवरे, शारदा पोवार, अभिजित भालेराव, पवार आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना चौधरी म्हणाले की, बँकेने वित्तीय व्यवसायाबरोबरच सामाजिक बांधिलकी नेहमीच जपली आहे.

कोरोना टाळेबंदीच्या काळात बँकेने शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत ग्राहकांना अविरत सेवा देत सर्व सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. तसेच बँकेच्या माध्यमातून नगर शहरामध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत.

भारत सरकारच्या शहर स्वच्छता अभियानामध्ये भाग घेऊन बँकेच्यावतीने सलग आठवड्यातील प्रत्येक गुरुवारी (200 दिवस) शहरामध्ये स्वच्छता अभियान राबवून नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे काम बँकेतील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या सहकार्याने करण्यात आले.

यावर्षी बँकेच्यावतीने नगर शहरामध्ये नागरिकांना पर्यावरणा संदर्भात 200 झाडे लावून नागरिकांमध्ये जनजागृतीचा संदेश देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment