शाहू महाराज जयंतीस अमेरिकेतील छत्रपती शाहू प्रेमींचा सहभाग

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम ,27 जून 2020 :  स्मायलिंग अस्मिता कष्टकरी विद्यार्थी संघटनेच्या वतीने आज छत्रपती शाहू महाराजांची 146 वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी साई हॉस्पिटलचे संचालक डॉ.किरण कर्डिले अध्यक्ष तर गिरीश भांबरे हे प्रमुख पाहुणे म्हणून व्हिडिओ कॉलव्दारे सहभागी झाले होते.

अध्यक्ष पदावरून बोलताना डॉ.किरण कर्डीले यांनी सांगितले की, छत्रपती शाहू महाराजांनी काळाची पावले ओळखून पुढील 100 वर्षांत भारताच्या उभारणीसाठी शेती आणि शिक्षण या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहे

हे लक्षात घेऊन त्यांनी राधानगरी धरणाची उभारणी करत सिंचनाचे महत्त्व विशद केले आणि भारतात सर्वाधिक शैक्षणिक संस्था उभारून बहुजनांच्या मुलांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या.

छत्रपती शाहु महाराज यावर थांबले नाहीत तर यापुढचे पाऊल टाकत त्यांनी आरक्षणाची तरतूद करत करवीर संस्थानचे वेगळेपण भारतीय उपखंडात अधोरेखित केले, म्हणूनच त्यांना आरक्षणाचे जनक संबोधले जाते.

उद्योजक गिरीश भांबरे यांनी सांगितले की, छत्रपती शाहू महाराजांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना विदेश शिक्षणासाठी मदत केली. त्यानंतर सुध्दा मुकनायक हे साप्ताहिक सुरू करण्यासाठी आर्थिक मदत केली.

सोनतळी कॅम्पची उभारणी करत भटक्या विमुक्तांना कामाची सवय लावत समाजात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यामुळे मोठे सामाजिक अभिसरण झाले.

यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष विशाल म्हस्के यांनी म्हटले की, अवघे 47 वर्षे वय लाभलेल्या राजर्षी शाहू महाराजांनी अव्दितीय कार्य करत ब्रिटिश सत्तेला शह दिला;

त्यामुळे भारतील अनेक संस्थांने ब्रिटिशांनी खालसा केली पण छत्रपतीपद आणि करवीर संस्थानचे राज्य अबाधित राहीले. कार्यक्रम प्रा.सदाशिवराव निर्मळे यांच्या घरी सामाजिक अंतर पाळत संपन्न झाला.

यावेळी अमेरिकेतील छत्रपती शाहू महाराज प्रेमी निलेश महाले आणि माधुरी महाले व्हिडिओ कॉल व्दारे सहभागी झाले होते. कार्यक्रमाला शिक्षिका भारती गाडेकर, दादा सुर्यवंशी, दिलीप गाडेकर, सौ वनिता निर्मळे, आसिफ शेख उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष यशवंत तोडमल यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिन सापते यांनी केले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment