जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता @397 !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 :  नगर शहर व जिल्ह्यात शनिवारी १५ नवीन रुग्ण आढळून आले. त्यात नगर शहरात ६ नवे रुग्ण आढळून आले असून गेल्या तीन दिवसांच्या तुलनेत शनिवारी नवे रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी होते.

जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता ३९७ झाली असून, सध्या नगर जिल्ह्यातील १११ कोरोनाग्रस्त रुग्णावर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत १३ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. जिल्ह्यात कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता २७३ झाली.

दरम्यान, शहरातील तारकपूर, आडते बाजार या परिसरात प्रथमच रुग्ण आढळून आले. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या आडते बाजारात रुग्ण आढळून आल्यानंतर व्यापाऱ्यांनी या भागातील दुकाने पुढील तीन दिवसासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

शनिवारी श्रीगोंदे, कोपरगाव, संगमनेर, श्रीरामपूर, पारनेर, राहाता तालुक्यात ही रुग्ण सापडले. गेल्या आठ दिवसांपासून नगर शहर व जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण संख्या सातत्याने वाढत आहे.

गेल्या शनिवारी जिल्ह्यात सहा रुग्ण आढळून आले होते.रविवारी अठरा रुग्ण आढळून आले होते. सोमवारी एकही रुग्ण आढळून आला नाही. त्यानंतर मंगळवारी दोन रुग्ण आढळून आले होते.

बुधवारी तब्बल २४ रुग्ण आढळून आले होते, तर गुरुवारी पुन्हा २६ रुग्ण आढळून आले. शुक्रवारी सर्वाधिक जिल्ह्यात २८ नवे रुग्ण आले. यात नगर शहरातील २४ रुग्ण होते.

विशेष म्हणजे जिल्ह्याच्या ग्रामीण भागापेक्षा नगर शहरात रुग्ण संख्या ही गेल्या आठ दिवसांत वाढलेलीच होती. शनिवारी देखील नगर जिल्ह्यात नवे पंधरा रुग्ण आढळून आले असून, त्यात नगर शहरातील सहा जणांचा समावेश आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment