गुन्हा दाखल होताच डॉ.बोरगेसह शंकर मिसाळ,घाटविसावे पसार ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम ,30 जून 2020 :बोल्हेगाव परिसरातील एका अल्पवयीन मुलास त्याच्या घरात घुसून मारहाण करत छळ केल्याप्रकरणी महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे,

अग्निशमन विभागाचे प्रमुख शंकर मिसाळ, कर्मचारी बाळू घाटविसावे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर ते तिघेही पसार झाले आहेत.

गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना अटक करण्यासाठी तोफखाना पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक किरण सुरसे यांचे पथक रविवारी रात्रीच या तिघांच्या घरी गेले होते. परंतु, ते घरी आढळून आले नाहीत.

सोमवारी दिवसभर ते महापालिकेतही नव्हते. तपासी अधिकारी सहायक निरीक्षक रवींद्र पिंगळे यांनी आरोपींच्या घरी, पालिकेत व इतर ठिकाणी शोध घेतला.मात्र ते आढळून आले नाही, पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

महापालिकेच्या रुग्णालयात नर्स म्हणून काम करत असलेल्या एका महिलेसोबत मिसाळ यांचे संबंध असल्याचा आरोप त्या महिलेच्या मुलाने केला आहे. हे सर्व मला घरी येऊन मारहाण करतात व माझा छळ करतात.

यामध्ये माझ्या आईचा सहभाग असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यामुळे पोलिसांनी त्या मुलाच्या आईसह डॉ. बोरगे, मिसाळ व घाटविसावे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आला आहे.

ही घटना महापालिकेसह शहरामध्ये चर्चेचा विषय झाली आहे. गुन्हा दाखल होताच तोफखाना पोलीस आरोपींना अटक करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, अग्निशमन विभागाचे प्रमुख शंकर मिसाळ हे महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी आहेत. पोलिसांनी सोमवारी त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला परंतु ते आढळून आले नाहीत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment