देशात लोकशाही संपुष्टात येऊन कोरोनाशाही असतित्वात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम ,4 जुलै 2020 :कोरोना फोबीयामुळे महाराष्ट्रासह देशात लोकशाही संपुष्टात येऊन कोरोनाशाही असतित्वात आली आहे. कोरोनाच्या नावाखाली न्यायालयासह सरकारी कार्यालयाची दारे सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

यासाठी पीपल्स हेल्पलाईनने सर्वसामान्यांचे कामे होण्यासाठी कर्तव्य बजवा, कोरोनाशाही संपवाची घोषणा केली असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.

कोरोनाच्या नावाखाली अंधेर नगरी चौपट राजाचा कारभार सध्या महाराष्ट्रासह देशात चालू आहे. न्यायसंस्था व सरकारी नोकर काम करण्यास तयार नाही.

लोकशाहीचे रुप कोरोनाशाहीने धारण केले आहे. कोरोनाशाही हद्दपार करुन सर्वसामान्यांना न्याय मिळण्यासाठी सर्वांनी कर्तव्य बजावण्याची वेळ आली आहे.

कोरोनाला न घाबरता पुरेपूर दक्षता पाळून प्रत्येक व्यक्ती आपले काम करु शकतो. सर्वसामान्य नागरिक आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी रोजचे कामकाज करत आहे.

मात्र न्यायसंस्था, सरकारी कार्यालयात काम होताना दिसत नाही. कोरोनाच्या नावाखाली किती दिवस घरी बसणार? सर्वसामान्यांची कामे होणे महत्त्वाचे असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

कोरोनाशाहीमुळे देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली. इतर देशात कोरोना संकटानंतर कामे सुरळीत सुरु झाली असून, भारतात देखील कोरोनाला न घाबरता दक्षता पाळून आपली जबाबदारीची कामे करण्याची गरज आहे.

कोरोना फोबीयामुळे देश अडचणीत आला असल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी म्हंटले आहे. कोरोनाशाही संपविण्यासाठी अ‍ॅड. गवळी, कॉ.बाबा आरगडे,

अशोक सब्बन, सुधीर भद्रे, वीरबहादूर प्रजापती, प्रा.कॉ.महेबुब सय्यद, शाहीर कान्हू सुंबे, आर्किटेक अर्शद शेख प्रयत्नशील आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment