राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार व भाजपाचे माजी मंत्री राम शिंदे आमने-सामने

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम ,4 जुलै 2020 :   पंचायत समितीच्या सभापतिपदासाठी भाजप व राष्ट्रवादी आमने-सामने उभे ठाकले आहेत. एकूण तीन अर्ज दाखल करण्यात आले.

भाजपच्या मनीषा सुरवसे, राष्ट्रवादीच्या राजश्री मोरे यांच्यासह नागरिकांचा मागास प्रवर्गमधून डॉ. भगवान मुरुमकर यांनी अर्ज भरले होते.

सुरवसे व मोरे यांचे अर्ज वैध ठरवण्यात आले, तर डॉ. मुरुमकर यांचा अर्ज अवैध ठरला. मोरे यांना सूचक सुभाष आव्हाड, तर सुरवसे यांचे सूचक डॉ. मुरुमकर आहेत.

सर्वसाधारण महिलेसाठी पद आरक्षित आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार केवळ निवडणूक प्रक्रिया झाली. निर्णय राखीव ठेवण्यात आला आहे. सभापतिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता आहे.

सुरवसे यांचे पती रवी सुरवसे हे शिंदे यांचे समर्थक तर मोरे यांचे पती सूर्यकांत मोरे हे रोहित पवार यांचे खंदे समर्थक आहेत.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार व माजी मंत्री राम शिंदे यांच्या समर्थकांमध्ये ही लढत होणार असल्यानं आता पवार विरूद्ध शिंदे यांच्यातच अप्रत्यक्ष झुंज होणार असल्याची चर्चा पंचक्रोशीत रंगली आहे.

माजी सभापती व विद्यमान सदस्य प्रा. सुभाष आव्हाड यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार राजश्री मोरे यांना पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादी व भाजपकडे दोन-दोन समान सदस्य संख्या झाली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

 

Leave a Comment