पांडुरंग कृपेने कोरोना महामारी लवकरच संपेल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 :  सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र बंद आहे. शासनातर्फे विविध स्तरांवर उपाययोजना सुरू करून जनजीवन पूर्वपदावर आणण्याचे काम सुरू आहे. त्यात सर्वांचा सहभाग व संघटित प्रयत्न आवश्यक आहे.

आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांनी पंढरपूरला वारीने न जाता घरातच विठ्ठल-रुख्मिणीची पूजा करून कोरोना संकट दूर करण्याचे साकडे घातले आहे.

पांडुरंग हा सर्वांच्या भक्तीला पावणारा आहे. त्यामुळे वारकऱ्यांची ही हाक तो नक्कीच ऐकेल व ही कोरोना महामारी लवकरच संपेल, असे विश्वास राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केला.

वारकरी सेवा संघाच्या कार्यालयास चाकणकर यांनी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी वारकरी सेवा संघाचे अध्यक्ष विश्वनाथ राऊत महाराज यांनी त्यांचा सत्कार केला.

याप्रसंगी पुणे मनपाच्या नगरसेविका गलांडे, सुभाष राऊत, सतीश राऊत, निता व श्रावणी राऊत उपस्थित होते. चाकणकर म्हणाल्या, जिल्हा वारकरी सेवा संघाचे काम उत्कृष्ट आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी संयमाने पंढरपूरला जाणाऱ्या दिंड्या रद्द करून वारकऱ्यांमध्ये चांगली जनजागृती केली आहे. वारकरी सेवा संघास आपले नेहमीच सहकार्य राहील.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment