ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

‘तो’ चक्क महिलांचा गळाच आवळतो!

0

अहमदनगर Live24 टीम ,6 जुलै 2020 :  पहाटेच्या वेळी घरासमोर सडा रांगोळी करणाऱ्या महिलांचा गळा आवळून दागिने चोरी करण्यात येत आहे.

ही  घटना पाथर्डी शहरात घडली आहे. तरी या चोराचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील महिलांनी केली आहे.

Advertisement

या अज्ञात व्यक्तीचा महीला वर्गाने चांगलाच धसका घेतला आहे. गेल्या सहा महीन्यात शहरात अशा चार घटना घडल्या आहेत.हा व्यक्ती सराईत गुन्हेगार असुन त्याला पकडावे अशी मागणी करण्यात आली आहे.

पहाटे पाणी भरण्यासाठी किंवा व्यायामासाठी, रांगोळी काढण्यासाठी घराच्या दारात असणाऱ्या एकटी महिलांना पाहुन त्यांचा गळा आवळुन दागीने पळवणारा हा इसम महीलांची डोकेदुखी ठरला असून, याचा चांगलाच धसका महीलांनी घेतला आहे.

Advertisement

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Advertisement
li