ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

‘ही’महाआघाडी सरकारची बनवेगेरी

0

अहमदनगर Live24 टीम ,6 जुलै 2020 : पारनेर नगरपंचायतीचे शिवसेनेचे ५ नगरसेवकांसह इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांना जर राष्ट्रवादीत घेतले नसते तर ते भाजपच्या वाटेवर होते.

असा खुलासा आ. लंके यांनी पक्षश्रेष्ठी व माध्यमांकडे केला आहे. तो चुकीचा आहे. ही महाआघाडी सरकारची बनवेगेरी आहे. असा आरोप तालुकाध्यक्ष वसंत चेडे यांनी केला आहे.

Advertisement

सध्या राज्यात शिवसेना राष्ट्रवादी व काँग्रेस महाआघाडीचे सरकार असुन या नगरसेवकांच्या प्रवेशावरून शिवसेना व राष्ट्रवादी पक्षांमध्ये जुंपली आहे.

त्यांनी याचे खापर भाजपच्या माथी फोडले आहे. प्रत्यक्षात ते नगरसेवक भाजपाच्या संपर्कात नव्हते तसेच या नगरसेवकांच्या प्रवेशाबाबत एकदाही चर्चा झाली नसल्याचा खुलासा त्यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केला आहे.

Advertisement

त्यामुळे या नगरसेवकांच्या प्रवेशाबाबत महाआघाडीतच बनवाबनवी केली जात असून, आता फोडाफोडीचे राजकारण करत एकमेकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप चेडे यांनी केला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

Advertisement

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Advertisement
li