भाजीपाल्याची शेतकरी ते ग्राहक थेट विक्री !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम ,6 जुलै 2020 : शेतकऱ्यांनी पिकवलेला भाजीपाला, फळे, धान्य थेट बाजारात आणून नागरिकांना माफक दरात ते मिळाले पाहिजे या उद्देशाने कोपरगाव बाजार समितीने बैलबाजार येथील शेडमध्ये शेतकऱ्यांना जागा उपलब्ध करून दिली.

यामुळे शेतकरी ते ग्राहक अशी थेट विक्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य शासनाने संत शिरोमणी सावता माळी शेतकरी बाजार अभियान राबवण्याचा निर्णय घेऊन शासनाने त्या संबंधीचे परिपत्रक काढले.

हे अभियान राबविण्याचे दिवसापासून बाजार समितीच्या विचाराधीन होते. त्यात काही शेतकऱ्यांनी याबाबत बाजार समितीकडे पाठपुरावा केला होता.

सभापती व संचालक मंडळांनी बैठक घेऊन शेतकरी भाजीपाला मार्केटला जागा देण्याचा ठराव मंजूर केला व बैलबाजार येथील शेडमध्ये या शेतकऱ्यांना जागा दिली व शेतकरी भाजीपाला मार्केटचा शुभारंभ बाजार समितीचे सभापती संभाजी रक्ताटे यांच्या हस्ते करण्यात आला .

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment