कोरोना ब्रेकिंग : चार जणांना कोरोना; एकाचा मृत्यू !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 :  संगमनेर शहरात आज ऑरेंज कार्नर आणि गणेशनगर परिसरात कोरोनाचे चार रुग्ण आढळले आले आहेत.तर निमगाव जाळी येथे देखील एका तरुणाला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.

आज श्रमिकनगर येथे एका ६५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर आता पुन्हा चार रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने संगमनेर तालुक्यात कोरोनाने १६९ चा आकडा गाठविला आहे.

आज ऑरेंज कार्नर येथे ५९ वर्षीय पुरूषाला व ७३ वर्षीय महिलेला कोरोना झाल्याचे समोर आले आहे.गणेशनगर येथे ६५ वर्षींय पुरुष कोरोनाबाधित असून निमगाव जाळी येथे पुन्हा कोरोनाचा प्रदुर्भाव वाढू लागला असून तेथे २८ वर्षीय तरुणाला कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल आज आरोग्य विभागाला प्राप्त झाला आहे.

श्रमिकनगर येथे चार दिवसांपुर्वी एक कोरोना बाधित रुग्ण आढळून आला होता. आज सकाळी तो एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती.हा व्यक्ती ६५ वर्षाचा असून तो संगमनेरमधील १३ वा बळी ठरला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

 

Leave a Comment