या’ तहसीलदारांची धडक कारवाई;केले असे काही …

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 :  मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केल्याने चिंता वाढली आहे.

पारनेर तालुक्यातही कोरोना रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाने धडक कारवाई हाती घेतली आहे. पारनेर तालुक्यातील निघोज येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या शासकीय नियामांचे पालन न करणार्‍या एका होलसेल किराणा दुकानासह बेजाबदारपणे वावर करणार्‍यांवर पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी कारवाई केली.

तसेच मंगळवारी सायंकाळी देवरे यांच्या पथकाने शासकीय नियमांचे उल्लंघन करणार्‍या अनेक व्यवसायिकांना व भाजी विक्रेत्यांना तसेच दुचाकी वाहन चालवणार्‍यांनाही चांगलाच चोप दिला.

मास्क न वापरणार्‍या ग्रामस्थांना उठाबश्या काढायला लावल्या. निघोज बसस्थानकावर बसणार्‍या भाजी विक्रेत्यांनाही हटविले.

तसेच बसस्थानकावरील अतिक्रमणे पडली असताना या ठिकाणी सुरु असलेली दुकाने तातडीने बंद करुन ही अतिक्रमणे हटविण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. त्यांच्या या कारवाईचे ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment