अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : दिवसभरात तब्बल 58 रुग्ण आढळले !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्यात आज दिवसभरात तब्बल 58 कोरोना रुग्ण आढळले आहेत, रात्री उशिरा 37 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले.

सकाळी 21 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे आज दिवसभरात 54 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.अहमदनगर जिल्ह्यात आज पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळले आहेत.  

37 रूग्णांमध्ये नगर शहरात 13 जणांना संसर्ग झाला आहे. त्यात चितळी रोडवरील सहा, सिद्धार्थनगरमध्ये २, पद्मानगर, टिळक रोड, सारसनगर, सावेडी आणि शिंपी गल्ली येथील प्रत्येकी एका रुग्णाच्या यात समावेश आहे.

त्याच प्रमाणे या रुग्णसंख्येत भिंगार येथील एका रुग्णाचा ही समावेश आहे. संगमनेर, श्रीगोंदे, नेवासे, शेवगाव येथेही रुग्ण आढळले आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment