नववधू पॉझिटिव्ह, तर वर निगेटिव्ह ! आणखी दोन जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम ,10 जुलै 2020 : अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाड्याजवळील जांभळे येथील लग्नातील नववधूसह आणखी दोन जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.

काळेवाडी येथे २५ जूनला झालेल्या लग्नातील नववधू’ पॉझिटिव्ह, तर वर निगेटिव्ह असल्याचे समोर आले.

तालुक्यात पॅाझिटिव्ह रुग्णांची संख्या ३८ झाली असून त्यापैकी २६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. ११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तालुक्यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून नागरिकांनी घरातच राहून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन तालुका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment