त्या’ ठिकाणच्या बंदचा पुरता ‘फज्जा’; व्यापाऱ्यांतील मतभेद चव्हाट्यावर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम ,10 जुलै 2020 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर शहरात व्यापारी असोसिएशनचे चार दिवस श्रीरामपूर शहर बंद पुकारला होता. परंतु या बंदचा पुरता ‘फज्जा’ उडाल्याचे चित्र काल शहरात पहावयास मिळाले.

मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संगमनेरमध्ये कोरोनाचा विस्फोट होत असतानाचे चिंताजनक चित्र असताना आता श्रीरामपूरमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.

श्रीरामपूर तालुक्यात करोना बाधितांची संख्या ४२ वर जावून पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर व्यापारी असोसिएशनने गुरुवार पासून चार दिवस ‘श्रीरामपूर बंद’ची घोषणा केली.

परंतु शहरातील काही व्यापार्‍यांनी एकतर्फी निर्णयाचा आरोप करून याला विरोध करत बंदमध्ये सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले होते.

व्यापारी असो. च्या पदाधिकार्‍यांनी हा बंद स्वयंस्फूर्तीने बंद असून कुणाही सक्तीने बंद नसल्याचे जाहीर केले होते. परंतु काल काही व्यापार्‍यांनी दुकाने उघडताच काही पदाधिकार्‍यांनी फोन करुन दुकाने बंद करण्यास प्रवृत्त केले

. तसेच काहींनी रोडवरुन फिरुन बंदचे आवाहन करत असताना दिसत होते. मात्र व्यापारी संघटनेच्या काही माजी पदाधिकार्‍यांचीच दुकाने उघडलेली होती.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment