नियमबाह्य फी उकळणाऱ्या शाळांवर गुन्हे दाखल करा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम ,10 जुलै 2020 :  कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या शाळा पुन्हा सुरू कधी होतील, याची शाश्वती नसताना नगरमध्ये काही शाळांनी ऑनलाइन शाळा सुरू केल्या आहेत.

सोबत संपूर्ण वर्षाची फी तसेच स्कूल व्हॅन, वह्या पुस्तके, गणवेशाचे पैसेही पालकांकडून सक्तीने घेतले आहेत. लॉकडाऊनमुळे संपूर्ण जग अडचणीत आलेले आहे.

असे असताना काही शैक्षणिक संस्था गैरफायदा घेऊन पालकांना मानसिक व आर्थिक त्रास देत आहेत. नियमबाह्य पध्दतीने काम करणाऱ्या या शाळांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये तत्काळ गुन्हा दाखल करावा,

अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केली आहे. याबाबत मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी जि. प. प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. यावेळी प्रमोद ठाकूर, अनिल बर्डे, अनिकेत शियात्त आदी उपस्थित होते.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment