पारनेरचे आमदार निलेश लंके तोंडावर पडले !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम ,10 जुलै 2020 : ऐन निवडणुकीच्या तोंडावर पारनेरमधील ५ शिवसेनेच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली.

त्यानंतर जे सत्तानाट्य घडले ते महाराष्ट्राने पहिले. त्यानंतर लगेच ५ दिवसांत ते नगरसेवक पुन्हा शिवसेनेत दाखल झाले. आता यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

आणि याच स्पष्टीकरणामुळे आमदार निलेश लंके तोंडावर पडले आहेत. अजित पवार म्हणाले ‘पारनेरचे ते नगरसेवक अपक्ष असल्याचे मला सांगण्यात आले होते. त्यामुळे मी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश दिला.

नंतर कळाले की ते शिवसेनेचे आहेत. मित्रपक्षाच्या नगरसेवकांना असा प्रवेश देणे मला पटले नाही, त्यामुळे त्यांना परत शिवसेनेत पाठवले’,

आणि या आधी आ. लंके आणि नगरसेवकांकडूनही ही प्रक्रिया खूप दिवसांपासून सुरू असल्याचे व चर्चा करूनच निर्णय झाल्याचे सांगितले होते. त्यामुळे अजित पवारांच्या वक्तव्यामुळे आ. लंके आणि संबंधित नगरसेवकही तोंडावर पडले आहेत.

खोटे बोलून पक्षप्रवेश झाला होता, असे यावरून दिसून येते. मात्र हे संगत असताना अजित पवार यांनी ‘हे नगरसेवक भाजपमध्ये जाऊ नयेत, म्हणून प्रवेश दिल्याचे सांगितल्याने आ. लंकेच्या एका दाव्याला दुजोरा मिळाला आहे.

तसेच ते म्हणाले की, नंतर मला कळाले की ते नगरसेवक अपक्ष नव्हे तर शिवसेनेचे आहेत. मग मी त्यांना परत पाठविण्याचा निर्णय घेतला. यासंबंधी मुख्यमंत्र्यांसोबत आमचे कोणाचेही काही बोलणे झाले नव्हते.

राष्ट्रवादी-काँग्रेस मिळून सत्तेत होतो, तेव्हाही आम्ही असे प्रवेश देत नव्हतो. हा प्रकार पूर्ण माहिती नसल्याने घडला आहे. त्यामुळे त्यात लगेच दुरुस्ती करण्यात आली. यापुढे सर्वच मित्रपक्ष अशा गोष्टींवर समन्वय ठेवून निर्णय घेतील.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment