मंत्री म्हणाले पुन्हा लॉकडाऊनचा काहीच विषय नाही… तुम्ही आता कोरोनासोबत जगायला शिका

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम ,10 जुलै 2020 :  कोरोनाची स्थिती, त्याचे संक्रमण वाढत चालले असले तरी राज्य सरकार कुठल्याही प्रकारचा लॉकडाऊन करण्याच्या विचारात नाही.

संगमनेरमध्ये जरी कोरोनाची स्थिती गंभीर असली तरी संगमनेरात पुन्हा लॉकडाऊन करण्याचा काहीच विषय येणार नाही. तुम्हीच आता कोरोनासोबत जगायला शिका, असा सल्ला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी संगमनेरच्या जनतेला दिला.

मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संगमनेरमध्ये कोरोनाचा जणू विस्फोट झाला आहे. संगमनेरमध्ये कोरोना संक्रमणाचे प्रमाण लक्षणीय आहे.

संगमनेर तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 164 वर जाऊन पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी संगमनेरमध्ये काल (गुरुवार) आढावा बैठक घेतली.

यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व्हे वाढविण्या सोबत टेस्ट वाढविण्याचे आदेश पालकमंत्री मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अप्पर पोलिस अधीक्षक दीपाली काळे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री पुढे म्हणाले, कुरण गावामध्ये कोरोना बाधित रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असली तरी नागरिकांनी घाबरून जाण्याचे अजिबात कारण नाही.

मात्र, सर्दी, खोकला, ताप यासारखे लक्षणे दिसू लागल्यास नागरिकांनी अंगावर न काढता तत्काळ घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाच्या कोव्हिड सेंटरमध्ये जाऊन उपचार करून घ्यावा,

जर वरील लक्षणे दिसणार्‍या नागरिकांनी हे आजार अंगावर काढले, तर पुढे त्यांची प्रकृती अत्यवस्थ होईल आणि त्याच्यावर मृत्यू पावण्याची दुर्देवी वेळ येईल,

अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. कोरोनावर जो पर्यंत औषध येत नाही तो पर्यंत सर्वांनी स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. येथून पुढील काळात सर्वांनी मास्क, सॅनिटाईझर इत्यादी शस्त्र स्वतःजवळ बाळगून संरक्षण करावे असेही आवाहन त्यांनी केले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment