…तर अहमदनगर पुन्हा लाॅकडाऊन होऊ शकते

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 : शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे कंटेन्मेंट व बफर झोनचा कालावधी संपलेल्या तोफखाना व सिद्धार्थनगर भागात हा कालावधी १४ जुलैपर्यंत वाढवण्यात आला.

आतापर्यंत निव्वळ शहरात ३११ रुग्ण आढळले आहेत. ही वाढ कायम राहिली, तर शहर पुन्हा लाॅकडाऊन होऊ शकते, असे संकेत  एका अधिकार्यांनी खासगीत बोलताना शुक्रवारी दिले.

अनलाॅक झाल्यानंतर शहरातील अर्थचक्र फिरू लागले होते. त्याबरोबरच परजिल्ह्यांतील नगरकरही घरी परतत होते. पुणे, तसेच मुंबईसह राज्याच्या विविध भागातून आलेले रुग्ण सुरूवातीच्या काळात बाधित असल्याचे आढळले. आता कोरोनाचा प्रादुर्भाव स्थानिक नागरिकांमध्ये झाल्याचे दिसत आहे.

मागील तीन महिन्यांत शहरात एकूण ३११ रुग्ण आढळले. आतापर्यंत शहरात एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. फैलाव रोखण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागासह प्रशासनाने विविध उपाय हाती घेतले आहेत.

आतापर्यंत नालेगाव, तोफखाना, आडतेबाजार, सिद्धार्थनगर, पद्मानगर हा भाग कंटेन्मेंट घोषित करण्यात आला. तोफखाना व सिद्धार्थनगरची कंटेन्मेंटची मुदत संपली होती. त्याला पुन्हा १४ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली. त्यामुळे दिल्लीगेटसह मध्य शहरातील काही भाग अजूनही बफर झोनमध्ये आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenewsc

Leave a Comment