जि. प. कर्मचारी पाॅझिटिव्ह, ‘हे’ गाव तीन दिवस बंद !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 :   पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील रहिवासी असलेला नगर जिल्हा परिषदेतील कर्मचारी कोरोना पाॅझिटिव्ह आढळल्याने तहसीलदार ज्योती देवरे यांनी भाळवणी गाव तीन दिवस पूर्ण बंद ठेवण्याचे आदेश दिले.

रुग्णाच्या घरापासून, तसेच ग्रामपंचायत कार्यालयापासून शंभर मीटरचा परिसर १४ दिवसांसाठी कन्टेन्मेंट झोन करण्यात आला. कातळवेढे येथील साठ वर्षांच्या व्यक्तीलाही बाधा झाल्याचे उघड झाले.

हा वृद्ध मुंबईला जाऊन आला होता. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी दिलेल्या माहितीनुसार पारनेर तालुक्यात आतापर्यंत ३६ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenewsc

Leave a Comment