पिचड यांनी पाण्याचे राजकारण केल्यानेच जनतेने त्यांना नाकारले…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम ,13 जुलै 2020 :  इतरांना गद्दार म्हणण्यापूर्वी आरशात बघून सांगा तुम्ही शरद पवार, अजित पवारांशी गद्दारी केली नाही का? तुम्हाला इतरांना गद्दार म्हणण्याचा अधिकार नाही.

अगस्ती कारखाना, अमृतसागर दूध संघ व अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीत हे पिता-पुत्र कशाला पाहिजेत? पिंपळगाव खांड धरणाची निर्मिती अजित पवार यांचीच आहे.

याबाबत कोणी श्रेय घेऊ नये, असा घरचा आहेर माजी मंत्री मधुकर पिचड यांना त्यांचे कार्यकर्ते जि. प. सदस्य रमेश देशमुख यांच्याकडून देण्यात आला.

देशमुख म्हणाले, पिंपळगावखांडसाठी केवळ पिचड कारणीभूत नाहीत. शरद पवार, अजित पवार, सुनील तटकरे यांच्याबरोबरच पाणीप्रश्नाचे अभ्यासक मीनानाथ पांडे, सीताराम गायकर, सीताराम देशमुख,

अधीक्षक अभियंता चंद्रमोहन हंगेकर, माजी सहसचिव रोहिदास लांडगे यांच्यासह अनेकांना याचे श्रेय आहे. पिचड यांनी पाण्याचे राजकारण केल्यानेच जनतेने त्यांना यावेळेस नाकारले.

पिंपळगाव खांडचे जलपूजन पिचड, माजी आमदार वैभव पिचड व आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या आठवड्यात झाले. या कार्यक्रमात धरणग्रस्त व लाभक्षेत्रातील लोकप्रतिनिधींना जाणीवपूर्वक दुर्लक्षित करण्यात आल्याची सल व्यक्त होत आहे.

त्यामुळेच तिसरे जलपूजन या प्रकल्पाच्या निर्मितीत अग्रणी असलेले अगस्ती कारखान्याचे संचालक व राष्ट्रवादीचे नेते मीनानाथ पांडे, जि. प. सदस्य देशमुख,

बाजीराव दराडे, मारूती मेंगाळ, दीपक महाराज देशमुख, विश्वनाथ शेटेे, नितीन गोडसे, रमेश भोर, किरण शेटे महाराज यांच्या हस्ते जलाशयात साडीचोळी अर्पण करून करण्यात आले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment