कोरोनामुळे साडेतीनशे वर्षांची ‘ही’ परंपरा होणार खंडीत?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक धार्मिक सण-उत्सव अत्यंत सध्या पद्धतीने साजरे होत आहेत. अनेक धार्मिक कार्यक्रमांना पूर्णतः बंदीही घातली आहे.

आता महाराष्ट्राची दक्षिण काशी समजल्या जाणार्‍या श्रीक्षेत्र पुणतांबा येथील कामिका एकादशीनिमित्त भरणार्‍या यात्रेवर करोनाचे संकट असून साडेतीनशे वर्षापासून चालू असलेली परंपरा खंडीत होण्याची शक्यता आहे.

योगीराज चांगदेव महाराज यांनी पुणतांबा येथे गोदावरी नदीच्या तिरावर शके 1218 माघ वद्य त्रयोदशीच्या म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी संजीवन समाधी घेतलेली आहे.

तेव्हापासून श्रीक्षेत्र पुणतांबा येथे दरवर्षी आषाढ महिन्यातील कामिका एकादशी तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी भव्य यात्रा भरत असते. कामिका एकादशीच्या दिवशी भरणार्‍या यात्रेत दरवर्षी किमान दोन लाखाच्या वर भाविक हजेरी लावतात.

तसेच संपूर्ण जिल्ह्यातून मोठ्या संख्येने पायी दिंडीने भाविक पुणतांब्याला येत असतात. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून प्रशासनामार्फत उद्याची आषाढी यात्रा रद्य करून

भाविकांसाठी चांगदेव महाराजांचे मंदिर बंद राहण्याची शक्यता आहे. दरम्यान प्रशासनाच्या आदेशाचे काटेकोर पालन आतापर्यंत योगीराज चांगदेव महाराज देवस्थानामार्फत केले जात आहे.

उद्याच्या आषादी एकादशीबाबतही जिल्हाधिकारी, तहसीलदार राहाता, पोलीस निरीक्षक राहाता, ग्रामपंचायत पुणतांबा यांनी दिलेल्या सूचनेचे पालन केले जाणार आहे, अशी माहिती देवस्थानचे विश्वस्त महेश मुरुदगण यांनी दिली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment