श्रीगोंदा : सहकार महर्षी काष्टी विविध कार्यकारी सेवा संस्थेचे सचिव निलंबित.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील सगळ्यात मोठी उलाढाल असलेल्या सहकार महर्षी काष्टी विविध कार्यकारी सेवा संस्थेचे सचिव सत्यवान बी. बुलाखे यांना निलंबित करण्यात आलं आहे. जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी याबाबत आदेश दिले आहेत. 

बुलाखे हे काष्टी सेवा संस्थेचे गेली २० ते २५ वर्षापासून  एकाच संस्थेत सचिव म्हणून काम करीत होते. त्यांच्यावर संस्थेच्या कामकाजाबाबत अनियमिता व नियमबाह्य काम केले असल्याचा ठपका ठेवून वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करण्यात आले होते म्हणून त्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

संस्थेमध्ये नागवडे कारखाना संचालक राकेश पाचपुते व प्रा.सुनिल माने तसेच संचालक मंडळ   माजी व्यवस्थापक जालिंदर पाचपुते यांच्यामध्ये गेली दोन महिन्यापासून संस्थेच्या वेगवेगळ्या विषयावर  वाद चालु होते. हा विषय अजून ताजा असतानाच आता बुलाखे यांचे निलंबन झाल्याने खळबळ उडाली आहे.

बुलाखे यांच्या निलंबन आदेशात म्हटले आहे की, त्यांनी बोगस कर्ज वितरण व अनधिकृत कर्जमाफी केली आहे. त्यात संस्थेचे तत्कालिन व व्यवस्थापक यांच्या नातेवाईकांना बोगस कर्ज व कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. संस्थेच्या मालाची उधारीवर विक्री करणे.संस्थेची माहिती प्रशासनाला सादर न करणे.

अशा प्रकारचा ठपका त्यांच्यावर ठेवला आहे. बुलाखे यांना तत्काळ निलंबित करुन आनंदा शिंदे यांना नवीन सचिवपदाची जबाबदारी  देण्याचे आदेशात म्हटले आहे. निलंबित सचिव बुलाखे यांची सखोल चौकशी करुन कारवाई करण्याचे आदेशात म्हटले आहे.

चौकट: ही संस्था सहकार क्षेत्रात आशिया खंडात अग्रगण्य म्हणून नावलौकिक मिळवला आहे. खते, बियाणे, कापड, किराणा, मशिनरी, मेडिकल आणि इतर विभाग संस्था चालविते. यामध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. तालुक्यात सोन्याची कोंबडी म्हणून संस्थेला ओळखले जाते.

भगवानराव पाचपुते व विलासराव पाचपुते या गटांमध्ये नेहमी सत्तेसाठी रस्सीखेच चालू असते. तालुक्याच्या राजकारणात या संस्थेचा मोठा सहभाग असतो. पण गेल्या काही महिन्यांपासून एकमेकांवर आरोपांचा गदारोळ उठला असून. हा प्रकार संस्थेसाठी हितावह नाही.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment