कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा लेटेस्ट अपडेट्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 (7.45 PM):- अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज सायंकाळी २९ रुग्ण बाधित आढळून आले. याशिवाय, खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या ३१ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली.

यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या आता १४२१ इतकी झाली असून उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या ५९४ इतकी झाली आहे.

आज सायंकाळी जिल्हा रुग्णालय कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये भिंगार १३, संगमनेर तालुका ०६ (मालदाड रोड ०१, रहेमत नगर ०१,

गणेश नगर ०१, निमोन ०१, निंबाळे०१), नेवासा ०५ (पुनतगाव ०२, सोनई ०३), नगर शहर ०३, श्रीरामपूर ०२ अशा रुग्णाचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या ३१ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली.
दरम्यान, आज सकाळी २१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले होते.

  • उपचार सुरू असलेले रुग्ण:५९४
  • बरे झालेले रुग्ण: ७९४
  • मृत्यू: ३३
  • एकूण रुग्ण संख्या:१४२१
  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

Leave a Comment