रस्‍त्‍यांच्‍या कामांकरीता २० कोटी ७५ लाख रुपयांचा निधी उपलब्‍ध – आ.विखे पाटील

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :- मतदार संघातील विविध रस्‍त्‍यांच्‍या कामांकरीता २० कोटी ७५ लाख रुपयांचा निधी उपलब्‍ध झाल्‍याने ग्रामीण भागातून मुख्‍य राज्‍यमार्गाला जोडणा-या ५ महत्‍वपुर्ण रस्‍त्‍यांच्‍या कामांना सुरुवात झाली आहे.

माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या पाठपुराव्यामुळे नाबार्ड कर्ज सहाय्य, अर्थसंकल्‍पातील तरतुद आणि विशेष दुरुस्‍ती निधीतून महत्‍वपुर्ण रस्‍त्‍यांची कामे सुरु झाली आहेत.

मतदार संघातील रस्‍ते विकासासाठी सातत्‍याने निधीची उपलब्‍धता करुन दळणवळणाच्‍या दृष्‍टीने उपाययोजना केल्‍या जातात. यासाठी शासनाच्‍या विविध योजनांचा निधी उपलब्‍ध होण्‍यासाठी सातत्‍याने पाठपुरावा सुरु ठेवला होता.

या कामासाठी मोठा निधी मंजुर झाला असल्‍याचे स्‍पष्‍ट करुन आ.विखे पाटील म्‍हणाले की, हसनापूर, लोणी बुद्रूक, आडगांव, केलवड, नांदुर्खी बुद्रूक, निमगाव ते प्रमुख राज्‍य मार्गाला जोडणा-या मार्गाचे रुंदीकरण,

मजबुतीकरण आणि डांबरीकरण करण्‍यासाठी नाबार्ड कर्ज योजनेतून ६ कोटी ९१ लाख रुपये मंजुर झाल्‍याने या रस्‍त्‍यांच्‍या कामांना सुरुवात झाली आहे.

हसनापूर, लोणी बुद्रूक, आडगांव, केलवड, नांदुर्खी बुद्रूक, निमगाव या मार्गावरील पुलाच्‍या कामांसह प्रमुख राज्‍यमार्गाला जोडणा-या रस्‍त्‍यासाठी २०१९-२० च्‍या अर्थसंकल्‍पातील तरतुदीतून ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्‍ध झाला,

शिर्डी बाह्यवळण मार्गास हा जोडला जाणार असल्‍याने वाहतुकीच्‍या दृष्‍टीने हा मार्ग महत्‍वपुर्ण ठरेल. तसेच काकडी ते केलवड रस्‍त्‍याच्‍या कामासाठी ४ कोटी ५० लाख रुपयांच्‍या निधीतून होत

असलेल्‍या याकामामुळे शिर्डी विमानतळाकडे जाणारा मार्ग जोडला जाईल. खडकेवाके, पिंपळस, दहेगांव,को-हाळे, वाळकी या मार्गासाठी ३ कोटी ४९ लाख, खडकेवाके,

पिंपळस, दहेगांव, को-हाळे, वाळकी या रस्‍त्‍यांच्‍या कामासाठी विशेष दुरुस्‍ती योजनेतून ८ कोटी रुपयांच्‍या निधीची तरतुद या रस्‍त्‍यांच्‍या कामासाठी झाली असल्‍याचे आ.विखे पाटील यांनी सांगितले.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

Leave a Comment