थोडंसं मनातलं… मा. खासदार साहेब आपणच सांगा कोरोनाचा प्रसार होण्यासाठी जबाबदार कोण? 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नमस्कार मित्रहो, प्रथमतः एक गोष्ट क्लिअर करतो की,मी कुठल्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता किंवा पदाधिकारी नाही तसेच प्रशासनाचा प्रवक्त्ता पण नाही. त्यामुळे कोणावरही टिका टिप्पणी करणे किंवा कोणाला टार्गेट करणे किंवा राजकीय बदनामी करणं हा हेतू नव्हता व नाही. अहमदनगर शहरातील मी एक सर्वसामान्य नागरिक असुन सर्वसामान्य माणसाला येत असलेल्या अडीअडचणी संदर्भात “थोडंसं मनातलं” हे सदर लिहून जनजागृती करतोय. राजकारणातील सर्वच चांगल्या आणि समाजाशी नाळ असणारे लोकप्रतिनिधी मला आवडतात. जे मला वाटते ते लिहून टाकतो. 

महाराष्ट्रातील कोविड-19 ची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे तसेच अहमदनगर जिल्ह्यातील व शहरातील कोविड-19 ची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आता तर अहमदनगर जिल्ह्यात व शहरात दररोज नवीन नवीन जवळपास शंभर च्या पुढे रुग्ण सापडतात. त्यामुळे सध्याची कोविड-19 ची परिस्थिती भयानक निर्माण झाली आहे. अहमदनगर जिल्ह्याचे चारही बाजूचे असलेले औरंगाबाद,  पुणे,नाशिक,बीड आणि सोलापूर या जिल्ह्यातील मा .आयुक्त साहेब यांनी  कोविड-19 ची वाढती संख्या पहाता पुन्हा एकदा एकदा पुर्ण पणे लाॅकडाऊन व संचारबंदी जाहीर केली आहे.

गेल्या मार्च महिन्यापासून जिल्ह्यातील व शहरातील कोविड-19 चा प्रादुर्भाव पुर्णपणे आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन आणि महापालिका प्रशासन विविध उपाययोजना करतच आहेत.आणि त्याचाच परिणाम म्हणुन अनेक रूग्ण बरे झाले आहेत हे सुद्धा नाकारता येणार नाही. काल परवाच अहमदनगर दक्षिण चे सन्माननीय खासदार आदरणीय श्री डाॅ. सुजयजी विखे पाटील साहेब यांची वर्तमान पत्रात व फेसबुक वर आलेली बातमी वाचण्यात व पहाण्यात आली. वास्तविक पहाता डाॅ. विखे पाटील यांचे खासदार होण्या अगोदर सुद्धा सामाजिक काम फार मोठ्या प्रमाणात होतेच तसेच ते तरूणाईला साद घालणारे नेते आहेत.

लोकप्रतिनिधी व खासदार म्हणून डाॅक्टर विखे पाटील साहेब यांनी मांडलेली भूमिका आणि मुद्दे एकदम बरोबर आणि खरेच आहेत. आदरणीय खासदार  डाॅ. विखे पाटील साहेब यांनी त्यांचे प्रसिद्ध पत्रक आणि  चॅनेल ला दिलेल्या मुलाखतीत असे म्हटलं आहे की, “जर अहमदनगर जिल्ह्यातील व शहरातील कोविड-19 ची संख्या वाढली आणि तांडव निर्माण  झाला तर त्याला जबाबदार मा जिल्हाधिकारी साहेब असतील, त्या मुळे लवकरच कर्फ्यु लावावा”. आदरणीय खासदार साहेब आपली मागणी रास्त आणि योग्य आहे परंतु आपणच सांगा कोविड-19 चा प्रसार होण्यासाठी जबाबदार कोण आहे?

सरकारने व जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन आणि महापालिका प्रशासन यांनी प्रत्येक वेळी मार्गदर्शक सूचना वेळोवेळी दिलेल्या आहेत, त्या सूचनांचे काटेकोर पालन जनता का करत नाही? लाॅकडाऊन व संचारबंदी च्या काळात किती बेकायदेशीर व्यवसाय सुरूच होते? बेकायदेशीर व्यवसाय व उद्योग धंदे करणारे लोकांना कोणाचा वरदहस्त व पाठिंबा होता? आजही अनेक बेजबाबदार लोक अनलाॅकडाऊन चा गैरफायदा घेत आहेत आणि दोन नंबर चे धंदे करत आहेत याची जबाबदारी कोणाची आहे? गोरगरीब लोकांना अर्थिक समस्या निर्माण होऊ नये,तसेच सर्व सामान्य जनतेला उपासमारीच्या संकटांना सामोरे जावे लागु नये म्हणून उद्योग व्यवसाय सुरू करणे ही चूक आहे का?असे एक ना अनेक प्रश्न निर्माण होतात.

प्रशासनाने जर कडक धोरण अवलंबित केले तर अनेक राजकीय पक्षांचे नेते अंदोलने व उपोषण करतात. वास्तविक पहाता आपण तर भारतातील सर्व खासदारांचे पेक्षा वयाने तरूण आणि उच्च विचारसरणी व उच्च शिक्षीत खासदार आहेत म्हणून आपला आम्हाला व नगरकरांना सार्थ अभिमान वाटतो. पण साहेब जनता आपलेच ऐकते हे मात्र नाकारून चालणार नाही. त्यामुळे जर आपणच अहमदनगर जिल्ह्यातील व शहरातील सर्व जनतेला कोविड-19 चा प्रादुर्भाव पुर्णपणे आटोक्यात आणण्यासाठी शासकीय मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यासाठी आवाहन केले तर निश्चितच या मध्ये चांगला प्रतिसाद मिळू शकेल यात शंकाच नाही.

सध्या कोविड-19 च्या काळात राजकारण करण्याची वेळ नाही परंतु तरीही काही लोक राजकारण करतातच. आदरणीय खासदार साहेब सध्या तरी अहमदनगर शहराचे आमदार श्री संग्राम भैय्या जगताप हे एकटेच  दररोज कोविड-19 व साथीचे रोगराई पसरू नये म्हणून प्रयत्नशील आहेत आहेत असे दिसते .अहमदनगर च्या वैभवात भर घालणा-या उड्डाणपूलाचे संदर्भात खासदार म्हणून डाॅ विखे पाटील साहेब आणि आमदार श्री संग्राम भैय्या जगताप यांनी राजकारण न करण्याची घेतलेली भूमिका खरोखरच अभिमानास्पद आहे. आदरणीय खासदार साहेब आपण मा जिल्हाधिकारी साहेब व प्रशासन यांना दोष देऊन काही उपयोग नाही.

खरं जनतेलाच आपण नियमाचे उल्लंघन केले तर आपण मरणार आहोत हे समजत नाही. प्रशासन कोविड-19 चे संदर्भात दररोज जनजागृती करतेय.     परंतु केवळ काही बेजबाबदार लोकांच्या बेफिकरपणे वागणे आणि शासकीय नियमाचे काटेकोर पालन न केल्यानेच अहमदनगर जिल्ह्यातील व शहरातील कोविड-19 चा प्रसार झालेला आहे हे सुद्धा नाकारता येणार नाही. आता जर जनतेला वाचवायचे असेल तर जिल्ह्यात पुन्हा एकदा पुर्ण पणे लाॅकडाऊन करणेच योग्य आहे असे वाटते आहे हे आपले म्हणणे एकदमच बरोबर आहे . वास्तविक राज्य सरकारनेच इतक्या लवकर अनलाॅकडाऊन करणे योग्य नव्हते.

त्यातच अनलाॅक भाग 2 मध्ये सरकारने जास्तच प्रमाणात शिथिलता आणली आहे. त्यामुळे अनेक उद्योग व्यवसायासह हाॅटेल आणि लाॅज , दारू दुकाने, तसेच  छोटे छोटे व्यवसाय सुरू केले आहेत. परंतु जनतेकडून शासकीय सूचना चे काटेकोर पालन झाले नाहीत. लोकांना जरा जास्तच मोकळीक मिळाली म्हणून लोकांनी शासकीय नियमांची अक्षरशः पायमल्ली केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील संगमनेर, पाथर्डी, जामखेड, नेवासा आणि इतर तालुक्यातील रूग्णाची संख्या वाढत आहे. तसेच शहरात सुद्धा दररोज कोरोना बाधीत रूग्ण सापडले आहेत. आता प्रशासनाने कठोर भूमिका घेण्याची गरज आहे. कोल्हापूर, सोलापूर, बीड, नाशिक,  पुणे आणि औरंगाबाद च्या धर्तीवर अत्यावश्यक सेवा वगळून अहमदनगर शहरात पुर्ण पणे लाॅकडाऊन करणेच योग्य आहे असे वाटते. तरच काही प्रमाणात कोविड-19 ची साखळी खंडीत होऊन  कोरोना आटोक्यात येईल असे वाटते आहे.

परंतु हे सर्व सत्यात उतरण्या साठी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व पक्षिय नेत्यांनीच  एकत्रित येऊन जनतेला आवाहन करणे गरजेचे आहे तरच काही प्रमाणात हा प्रश्न मार्गी लागेल असे वाटते. त्यामुळे आदरणीय खासदार डाॅ. विखे पाटील साहेब, कोविड-19 चा प्रसार होण्यासाठी फक्त आणि फक्त बेजबाबदार लोकच जबाबदार आहेत हे स्फटिका इतके स्पष्ट आहे. आता सर्व सामान्य  जनतेला कोविड-19 पासुन  वाचविण्याची जबाबदारी कोणाची आहे हे आपणच सांगा साहेब? वास्तविक पहाता लाॅकडाऊन व संचारबंदी च्या काळात गोरगरीब लोकांना उपासमारीच्या संकटांना सामोरे जावे लागु नये, त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा तसेच विस्कळीत झालेली अर्थिक व्यवस्था सुधारण्या साठी मदत होईल म्हणून सरकार आणि जिल्हा प्रशासन यांनी अहमदनगर जिल्ह्यातील व शहरातील लाॅकडाऊन व संचारबंदी शिथील केली.

आजही अहमदनगर शहरात परवानगी नसताना व शासकीय नियमाचे उल्लंघन करून वसंत टाकीज माळीवाडा, अमरधाम च्या पाठीमागे, सारसनगर रोड व उपनगरातील भागात अक्षरशः गटारीवर भाजीपाला बाजार भरतोच. याभागातील लोकांनी यापूर्वी अनेक तक्रारी केल्या नंतर महापालिका प्रशासनाने त्याची दखल घेतली आहे. त्यांचेवर केसेस दाखल केल्या आणि दंड सुद्धा आकारला आहे. परंतु पुन्हा प्रश्न पडतोच की, वास्तविक या भागात बेकायदेशीर भाजीपाला बाजार भरतोच कुणाच्या आधारावर हाच अनुत्तरीत प्रश्न निर्माण झाला आहे. भाजी विक्रेत्यांकडे मास्क, हॅन्डवाॅश सॅनिटायझर नसतात तर सोशल डिस्टन्स ठेवला जात नाही.यापूर्वी हा सगळा भाग कंटेनमेंट झोन व बफर झोन म्हणून जाहीर केला होता.

त्यामुळे त्या भागातील नागरिकांचे जिवितास धोका निर्माण झाला आहे. सध्या कोविड-19 ने डाॅक्टर आणि नर्स यांना सुद्धा बाधीत केले आहे. अजूनही कोविड-19 वर योग्य लस उपलब्ध झालेली नाही. आता पर्यंत प्रशासनाने  सुद्धा नागरिकांना खुप मोकळीक दिली आहे. परंतु अनेक बेरोजगार लोकांनी त्याचा गैरफायदा घेतला आहे.अर्थात लाॅकडाऊन व संचारबंदी च्या काळात सुद्धा अनेक बेजबाबदार लोकांचे अनेक बेकायदेशीर व्यवसाय सुरूच होते आणि यापुढेही ते निश्चितच सुरू राहतील यात शंकाच नाही. कारण जो पर्यंत अशा बेजबाबदार धनदाडंगे लोकांना राजकीय व शासकीय वरदान आहे तो पर्यंत हे असेच चालू राहणार आहेत.

जो पर्यंत अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवा वगळून शहरात येणारे इतर दुचाकी व चारचाकी वाहने रस्त्यावर आणण्याची बंद होणार नाहीत तो पर्यन्त गर्दी वाढतच जाणार आहे त्यामुळे फक्त प्रशासनाला जबाबदार धरणे चुकीचे ठरेल असे वाटते आहे . मा जिल्हाधिकारी साहेब आता खासदार साहेब म्हणतातच तर आपणच शहरातील कोविड-19 चा प्रादुर्भाव पुर्णपणे आटोक्यात आणण्यासाठी पोलिस प्रशासन, महापालिका प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी, डाॅक्टर, समाजसेवक, पत्रकार मंडळी आणि विविध सामाजिक कार्यकर्ते आणि संस्था यांचे सोबत त्वरित एक बैठक आयोजित करून शहरात पुर्ण पणे लाॅकडाऊन करण्या बाबतीत निर्णय घ्यावा हिच विनंती आहे. खरं तर ही वेळ जनतेला वाचविण्याची आहे फक्त राजकारण करण्याची नाही याची जाणीव असू द्या

कोविड-19 ची तपासणी करण्यासाठी गेलेली व्यक्ती अगोदरच घाबरवून गेलेली असते आणि त्यात रिपोर्ट पाॅजिटीव्ह आला तर भितीनेच लोक मरतात. त्यामुळे सरकारने सरकारी दवाखान्यात पुरेसे व्हेंटीलेटर, अवश्यक औषध, व्हॅक्सीन औषध, पुरेसे बेड इ. सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या तर गोरगरीब जनतेला निश्चितच त्याचा फायदा होईल आणि अर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही.   नागरिक हो अजुन ही भय संपले नाही याची जाणीव असू द्या हिच अपेक्षा.

घराबाहेर पडताना शासकीय सूचनांचे काटेकोर पालन करावे तसेच कोविड-19 बाबतीत थोडे जरी लक्षणे दिसू लागली की त्वरित डाॅक्टरनां दाखवा आणि तपासणी करून घेतली पाहिजे. विनाकारण घराबाहेर पडू नये. प्रशासनाने लाॅकडाऊन व संचारबंदी लागू करताना नागरिकांना पण विनाकारण त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी हि विनंती आहे.  एक मात्र निश्चितच आहे की,अचानक  घडलेल्या घटनेची सत्यता पडताळून पाहूनच रात्री अपरात्री येण्याची व जाण्यासाठी परवानगी द्यावी लागेल.

त्यामुळे आदरणीय लोकप्रतिनिधी सुचना लक्षात घेऊन  मा. जिल्हाधिकारी साहेब यांनी जिल्ह्यातील व शहरातील कोविड-19 चा प्रादुर्भाव पुर्णपणे आटोक्यात आणण्यासाठी लाॅकडाऊन जाहीर करणे योग्यच होईल. म्हणून आमची  आपणास नम्र विनंती आहे की, अहमदनगर जिल्ह्यातील व शहरातील जनता सुरक्षित रहावी म्हणून पुर्णतः लाॅकडाऊन व संचारबंदी लागू करावी हिच नम्र  विनंती.

ॲड शिवाजी अण्णा कराळे
सदस्य जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर
99 22 545 545

Leave a Comment