दुधाला प्रति लिटर 10 रुपये अनुदानाची घोषणा करावी अन्यथा कीसान सभेचे अंदोलन अटळ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,19 जुलै 2020 :- दुध उत्पादकांच्या दुधाला किमान 30 रुपये दर मिळावा यासाठी कीसान सभा आंदोलन करनार असल्याची माहीती डॉ. अजित नवले यांनी दिली आहे.

राज्यात किसान सभा व दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने सुरू केलेले आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनपूर्वी शेतकऱ्यांना गायीच्या दुधासाठी 30 ते 35 रुपये प्रति लिटर दर मिळत होता.

आज परिस्थिती पूर्व पदावर येऊन सुध्दा शेतकऱ्यांना केवळ 17 रुपये दर मिळतोय.पावडर बनविण्या,सरकारने प्रश्नाबाबत रास्त तोडगा न काढल्यास समविचारी संघटनांच्या बरोबरीने आंदोलन आणखी तीव्र करण्याची घोषणा किसान सभेने केली आहे.

दरम्यान दुधाबाबत सरकारच्या अपुऱ्या व पक्षपाती हस्तक्षेपामुळे शेतकऱ्यांना कोट्यवधींचा तोटा शेतकय्राना सहन करावा लागत आहे.

दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व किसान सभा या प्रश्नावर गेली महिनाभर विविध मार्गाने सरकारचे लक्ष वेधत होती. राज्यातील विविध शेतकरी नेते व संघटनाही या प्रश्नावर सक्रिय होत्या.

सरकारने या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटना, किसान सभा व दुध संघाची एकत्र बैठक 21 जुलै रोजी आयोजित करण्यात आली आहे. सरकारला प्रश्न माहीत आहे.

प्रति लिटर 10 रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केल्यास शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. बैठकांमध्ये वेळ वाया घळविण्या ऐवजी 10 रुपये प्रति लिटर थेट अनुदानाची सरकारने घोषणा करावी अशी मागणी किसान सभा करत आहे.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

Leave a Comment