ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमणुकीबाबत घेतलेला निर्णय विद्यमान सरपंचांवर अन्यायकारक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,19 जुलै 2020 :- राज्य सरकारने मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमणुकीबाबत घेतलेला निर्णय विद्यमान सरपंचांवर अन्यायकारक असल्याने हा निर्णय शासनाने त्वरित मागे घ्यावा,

अशी मागणी भाजपच्या प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.

राज्यातील यापूर्वी मुदत संपलेल्या व डिसेंबरअखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या सल्ल्याने संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रातील व्यक्तींची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला.

हा निर्णय अन्यायकारक असल्याने मागे घ्यावा, अशी मागणी कोल्हे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. गावगाड्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे सरपंच हे पद असून थेट गावपातळीवरील समस्यांची त्यांना जाणीव असते.

सध्याच्या कोरोनाच्या संकटात प्रशासनाच्या बरोबरीने काम करून अशा कठीण परिस्थितीत सरपंच महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

नेहमी जनतेत वावरणारे हे पद असल्यामुळे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकाळात सरपंचांना मानधन वाढवून देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आणि ग्रामविकासाचे स्वप्न साकारण्यासाठी ग्रामपंचायतींना थेट निधी देण्याचे काम केले.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

Leave a Comment