आता ‘ह्या’ तालुक्यात वाढतेय कोरोना रुग्णांची संख्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण भरमसाठ वाढत आहेत. संमनेर, श्रीरामपूर, पाथर्डी या तालुक्यांत कोरोनाचे रुग्ण जास्तप्रमाणात आढळले आहेत.

आता राहुरी तालुक्यात कोरोनाने आपला विळखा घट्ट करण्यास सुरुवात केली आहे. राहुरी शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातही सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाल्याने कोरोनाचे संक्रमण वाढू लागले आहे.

काल दुपारी 4 वाजेच्या तालुका आरोग्य विभागाच्या अहवालानुसार पुन्हा देवळाली प्रवरा-राहुरी फॅक्टरी परिसरात तीन व राहुरी शहरातील 1 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीत रुग्णसंख्या दहा

तर राहुरी नगरपरिषद हद्दीत रुग्णसंख्या चार असून आजअखेर ग्रामीणसह शहरीभागाची एकूण बाधित रुग्ण संख्या 34 वर जाऊन पोहोचल्याने राहुरी तालुक्यात धोक्याची घंटा वाजू लागली आहे.

ह्या पार्श्वभूमीवर राहुरी शहर आज सोमवार दि.20 जुलै ते गुरुवार दि. 23 जुलैपर्यंत चार दिवस कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत जीवनाश्यकसह सर्व व्यवहार बंद राहणार आहेत.

व्यापारी असोसिएशन पदाधिकारी यांच्या काल सकाळी झालेल्या बैठकीत राहुरी शहर बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पारख यांनी दिली.

या पार्श्वभूमीवर कुणीही नियम मोडू नये, रस्त्यावर गर्दी अथवा मोकाटपणे फिरू नये, अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

Leave a Comment