डाॅक्टरसह आणखी सात कोरोना रुग्ण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :- राहुरी तालुक्यात देवळाली प्रवरा येथील एकाच कुटुंबातील तीन व्यक्ती, राहुरी शहरात तीन, तर वांबोरी येथे एक डाॅक्टर अशा सात जणांना कोरोना झाल्याचे रविवारी स्पष्ट झाले.

देवळाली प्रवराचा शेतकरी बाधित झाल्यानंतर त्याचे वडील असलेले माजी नगरसेवक (वय ७०), २० व २१ वर्षीय दोन युवकांना बाधा झाली.

एका संघटनेचा जिल्हाध्यक्ष व त्याची पत्नी शनिवारी कोरोना रुग्ण असल्याचे निदान झाले. राहुरीतील ६५ वर्षीय आई व दीड वर्षाच्या चिमुकल्या मुलीला कोरोना झाला.

वांबोरी येथील ७० वर्षीय डाॅक्टर बाधित असल्याचे निदान झाले. हे डाॅक्टर नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

देवळाली प्रवरा पालिका, राहुरी फॅक्टरी व पेपर मिल रस्ता परिसरात १० रुग्ण आढळून आल्याने पालिका प्रशासनाने १ आॅगस्टपर्यंत सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश जारी केला.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Leave a Comment