अहमदनगर ब्रेकिंग : गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या नगरसेवकाकडून जीवितास धोका

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :- शहरात1985 पासून नगरसेवक पदावर विराजमान असलेले व अनेक गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल असलेले शेख नजीर अहमद उर्फ नज्जू पैलवान (रा. झेंडीगेट) यांनी अनधिकृतरीत्या अतिक्रमण करुन,

अनेकांच्या जागा बळकावल्या आहेत, तर एका शैक्षणिक संस्थेत भ्रष्टाचार केल्याचा आरोप जमीन खरेदी विक्रीचे व्यावसायिक अरबाज सय्यद (लालूशेठ) यांनी करुन

या गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्यांकडून स्वत:ला व कुटुंबीयांना संरक्षण मिळण्याची मागणी पोलीस अधिक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

नगरसेवक शेख नजीर अहमद उर्फ नज्जू पैलवान यांनी आजपर्यंत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून मोठी अवैध संपत्ती जमा केली असल्याने त्यांची अँटिकरप्शन महासंचालक यांना समक्ष भेटून तक्रार केली आहे.

सदरील नगरसेवक, त्यांचे नातेवाईक व साथीदारांनी शहरातील विविध भागात खंडणी वसूल करणे, जागेवर अवैध कब्जा करणे, दंगली घडविणे, गोरगरिबांना मारहाण करण्याचे कृत्य केले आहे.

याप्रकरणी संबंधीतांवर गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी माहिती अधिकारात माहिती मागविण्यात आली आहे. नगरसेवक नज्जू पैलवान गेल्या पंचवीस वर्षापासून अनधिकृतरित्या एका शैक्षणिक संस्थेच्या चेअरमनपदावर विराजमान आहे.

या संस्थेत चेअरमनपदासाठी कोणतीही निवडणूक घेण्यात आलेली नाही. अनाधिकृत रित्या ते चेअरमनपदावर कित्येक वर्षापासून विराजमान आहेत.

तसेच या शैक्षणिक संस्थेत अनाधिकृतपणे शिक्षक भरती करण्यात आल्याचा आरोप देखील अरबाज सय्यद यांनी केला आहे. नज्जू पैलवान

यांनी नगरसेवक पदाचा दुरुपयोग करून झेंडीगेट भागासह शहरातील काही ठिकाणी अनधिकृतरीत्या अतिक्रमण केले आहे. या संदर्भात देखील महापालिकेत माहिती अधिकारात माहिती मागितली असून,

ती अद्याप देण्यात आलेली नाही. महापालिका, पोलिस विभाग तसेच इतर शासकीय विभागात त्यांच्या विरोधात तक्रारी व माहिती मागितल्याने सदरील नगरसेवक व गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेला त्यांचा पुतण्या रशीद शेख उर्फ डंडा,

जावई इमरान शेख उर्फ चमेली, त्यांची पाच मुले व नातेवाईक तसेच त्यांच्या समर्थकांकडून कुटुंबीयांच्या जीवितास धोका असल्याचे सय्यद यांनी निवेदनात म्हंटले आहे.

तर पोलीस अधिक्षकांकडे या गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्यांवर कारवाई करुन पोलीस संरक्षण मिळण्याची मागणे केली आहे.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Leave a Comment