शारीरिक शिक्षण ऑनलाईन अभ्यासक्रम व ई-कंटेंट निर्मितीसाठी शारीरिक शिक्षण तंत्रस्नेही पॅनल सरसावला

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 : कोवीड-19 मुळे राज्यभरातील शाळा बंद आहेत. अशा वेळी विविध संस्था, विषय संघटना, तंत्रस्नेही शिक्षकांनी तसेच शासनाच्या वतीनेही दुरस्थ शिक्षणाच्या आधुनिक वाटा हाताळत ऑनलाईन शिक्षण पद्धती दृढ करण्याचा मागील चार महिन्यापासून अविरत प्रयत्न आहे.

शासनाच्या दिक्षा अॅपच्या माध्यमातून सर्व विषयांचे अध्यापन सुरु असताना पाठपुरावा करूनही दिक्षा अॅपमध्ये अकरावी वगळता शारीरिक शिक्षणाला शासनाच्या वतीने न्याय मिळाला नाही, म्हणून महाराष्ट्रातील तंत्रस्नेही शारीरिक शिक्षकांना एकत्र करत शारीरिक शिक्षणाचे ई कंटेंट तयार करण्या संदर्भातील व सोशल मिडियाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी राज्यस्तरीय तंत्रस्नेही कार्यशाळेचे नुकतेच आयोजन महाराष्ट्र राज्य क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर यांच्या वतीने करण्यात आले होते.

महाराष्ट्रभरातून शारीरिक शिक्षणात सोशल मिडीया, अभ्यासक्रम, खेळ बाब, आरोग्य विषयक बाबी, लेखन विभाग या मध्ये काम करू इच्छिणाऱ्या शिक्षकांची माहिती गूगल सर्वेतून घेऊन 220 जणांचे महाराष्ट्र शारीरिक शिक्षण तंत्रस्नेही पॅनल तयार करण्यात आले.अभ्यासक्रम, खेळ व आरोग्य विषयक ऑडिओ-व्हिजुअल स्वरूपातील ई-कंटेंट तंत्रशुद्ध व व्यावसायिक कंटेंट सारखा कंटेंट तयार करणेसाठी सात दिवसीय राज्यस्तर तंत्रस्नेही कार्यशाळेचे मोफत आयोजन केले होते.या कार्यशाळेत राजेंद्र कोतकर यांचे मागदर्शनात प्रमुख तंत्रस्नेही दादा पाटील राजळे महाविद्यालयाचे फिजीकल डायरेक्टर रोहीत आदलिंग यांनी मार्गदर्शन केले.

15 जुलै पासून सुरु झालेल्या या कार्यशाळेत ईमेल तयार करणे, गूगल फॉर्म तयार करणे, गूगल फॉर्ममध्ये क्वीझ तयार करणे, प्रमाणपत्र जोडणे, इमेज जोडणे, व्हिडीओ लिंक जोडणे, ई-कंटेंट तयार करणे, पीपीटी तयार करणे, पीपीटी इफेक्ट देणे, पीपीटीपासून व्हिडीओ तयार करणे, स्मार्ट पीडीएफ तयार करणे, अभ्यासक्रमासंदर्भातील व विविध खेळ बाबींचे व्हिडीओ तयार करणेसाठी लागणारे मोबाईल व पीसी सॉफ्टवेअर व टुल्सची माहिती या कार्यशाळेत देण्यात आली.

शारीरिक शिक्षण विषयक तंत्रशुद्ध व्हिडीओंची निर्मिती कशी करावी हे विविध व्हिडीओच्या माध्यमातून दाखविले. कॉपीराईट इमेज, व्हिडीओ व म्युझीक या संबंधी माहिती देऊन कॉपीराईट नसणाऱ्या वेबसाईटची माहिती दिली. यु ट्युब चॅनल तयार करणे, व्हिडीओ अपलोड व शेअर करणे या सर्व बाबींची सखोल माहिती कार्यशाळेत रोहीत आदलिंग यांनी दिली. तसेच प्रशिक्षणानंतर कार्यशाळेतील घटकावर टास्क देऊन टास्क पूर्ण करणाऱ्या तंत्रस्नेही शिक्षकांना राज्य तंत्रस्नेही प्रमाणपत्र देण्यात आले.

तयार होणारे ई-कंटेंट शारीरिक शिक्षणाच्या ऑनलाईन अभ्यासक्रमासाठी राज्यभर सोशल मिडीयातून विद्यार्थ्यापर्यंत पोहचविले जाणार असून शारीरिक शिक्षण अभ्यासक्रम व विविध खेळ बाबींचे ई-कंटेंट व व्हिडीओ तयार करण्याचे कामकाज सुरु आहे. ई- कंटेंट तयार करण्यासाठी वेगवेगळी तंत्रस्नेही पॅनल तयार करण्यात आली आहेत. प्रत्येक तंत्रस्नेही पॅनलला एक तंत्रस्नेही पॅनलप्रमुख, तांत्रिक प्रमुख व सहकारी यांच्या मदतीने कंटेंट निमिर्तीचे सर्व अधिकार देण्यात आले आहेत. सदरील कंटेंट एकत्रितरित्या संकलीत करून यू-ट्युबवर अपलोड करून गूगल फॉर्म मध्ये सोशल मिडीयाच्या माध्यमातून राज्यभरातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविला जाणार आहे. सात दिवसीय राज्यस्तर तंत्रस्नेही कार्यशाळेचा शुभारंभ भारतीय खोखो टीमचे मा.उपकप्तान व धुळे येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू आनंद पवार यांच्या हस्ते झाला.

या तंत्रस्नेही कार्यशाळेस अॅथलेटीक्स राष्ट्रीय तांत्रिक समितीचे अधिकारी चंद्रकांत पाटील (पिंपरी चिंचवड), मुख्याध्यापक महासंघाचे जयदिप सोनखासकर (अकोला), रिलायन्स फाऊंडेशन स्कूलचे तंत्रस्नेही लक्ष्मण चलमले (रायगड), राज्य सचिव राजेंद्र कदम (सातारा), राज्य कोषाध्यक्ष घनःशाम सानप (अ.नगर), राज्य वरीष्ठ सहसचिव राजेश जाधव (जळगाव), सिलंबम व थायबॉक्सींगचे राज्य सचिव श्रीधर गायकवाड (पूणे),

मुंबई मनपा शारीरिक शिक्षण युनीटचे डॉ जितेंद्र लिंबकर राज्य समन्वयक दतात्रय मारकड (सिंधुदूर्ग), विभागीय अध्यक्ष दतात्रय हेगडकर (पूणे), राज्य तायक्वांदोचे मा.उपाध्यक्ष अविनाश बारगजे (बीड), कृष्णाजी गावडे (रत्नागिरी), राज्य समन्वयक अनिल पाटील (कोल्हापूर), जिल्हाध्यक्ष सुनील गागरे (अनगर) यांचे तंत्रस्नेही कार्य व दिशाबाबत मार्गदर्शन लाभले. कार्यशाळेच्या समारोपास महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचलनालयाचे संचालक जयप्रकाश दुबळे व सहाय्यक संचालक सुहास पाटील यांनी मार्गदर्शन केले.

शारीरिक शिक्षकांची तंत्रस्नेही कार्यशाळा महाराष्ट्राला दिशादर्शक ठरेल – संचालक जयप्रकाश दुबळे

आरोग्य व शारीरिक शिक्षण विषयाची व्याप्ती मोठी असून या विषयाचे ई कंटेंट तयार करण्यासाठी महाराष्ट्र शारीरिक शिक्षण तंत्रस्नेही पॅनलची निर्मिती होऊन शारीरिक शिक्षण व खेळ बाबींचा प्रचार-प्रसार व अभ्यासक्रम विषयक बाबींची निर्मितीसाठी घेण्यात आलेल्या कार्यशाळेच्या माध्यमातून तयार होणारे ई कंटेंट दर्जेदार स्वरूपाचे तयार होईल. अभ्यासक्रम व खेळ बाबींच्या ऑडीओ-व्हिजुअल माहितीने विषय आणखी प्रभावी होणार असल्याने हा प्रकल्प महाराष्ट्राला दिशादर्शक ठरेल असे मत महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचलनालयाचे प्र. संचालक जयप्रकाश दुबळे यांनी व्यक्त केले.

ई- कंटेंटमुळे शारीरिक शिक्षण प्रभावी ठरेल- सुहास पाटील, सहाय्यक संचालक

आरोग्य व शारीरिक शिक्षण हा विषय विद्यार्थ्यांना फिट ठेवण्यासाठी व रोगप्रतिकारक शक्ती विविध खेळांच्या माध्यमातून निर्माण करण्यासाठी महत्वाचा विषय आहे. या विषयाचे अभ्यासक्रम तयार असून काही वर्गांचे पाठ्यपुस्तक तयार आहेत. पण अभ्यासक्रमावर आधारीत ऑडीओ-व्हिजुअल स्वरूपातील तंत्रशुद्ध ई-कंटेंट अद्याप तयार नव्हते. महाराष्ट्र शारीरिक शिक्षण तंत्रस्नेही पॅनलच्या माध्यमातून ऑनलाईन कार्यशाळा घेऊन तंत्रस्नेही शिक्षक तयार होत आहेत. या तंत्रस्नेही शारीरिक शिक्षकांमार्फत तयार होणाऱ्या ई-कंटेंट मुळे शारीरिक शिक्षण प्रभावी ठरणार आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचलनालयाचे सहाय्यक संचालक सुहास पाटील यांनी केले.

या कार्यशाळेत राजेंद्र पवार, चंद्रकांत भोईटे (सातारा), संदिप घावटे, दिनेश भालेराव (अ नगर), विश्वनाथ बिरारी (ठाणे), अनिल दाहोत्रे, अजित काशिद, गोपीचंद कारंडे (पुणे), सुनील सुर्यवंशी,पंकज पाठक (नंदुरबार), स्वाती चौधरी (जळगाव), सोनाली सिरभाते (वर्धा), सुजाता जोशी, उमेश खंदारकर (जालना), विश्वनाथ बिरारी (ठाणे), देवेन सोनटक्के (नागपूर), कृष्णकांत बिसेन (भंडारा), भूपेंद्र चौधरी (गडचिरोली), उमेश कडू (चंद्रपूर), मंगेश कडू (वर्धा), गोवर्धन राठोड, बी. के. नागरे (बुलडाणा), अनिल वाकळे (पालघर), सचिन पाटील, संजय गायकवाड (कोल्हापूर), मोहन पाटील (उस्मानाबाद), सचिन पाटील (उस्मानाबाद), महेश सूर्यवंशी (लातुर), राहूल चौधरी, पंकज पाटील (जळगाव),

अभिजित दळवी, गणेश म्हस्के, उमेश झोटींग, विष्णू खांदोडे, बाळासाहेब कोतकर, अजित पवार (अ.नगर), चंद्रकांत ढिकले (नाशिक) आदींनी विविध तांत्रिक बाबी संदर्भात देवाण घेवाण केली. या कार्यशाळेसाठी हेमंत मालंदकर (सिंधुदूर्ग), पुरुषोत्तम पळसुले (पालघर), बापूराव बाबर, भारत इंगवले, बागल गणेश, राहुल काळे, रामनाथ तांबे (सोलापूर), हिमांशू तिवारी, आकाश कोलते (पुणे), संजय मैंद, अनंता शेळके (अकोला), पांडूरंग केंद्रे, निलेश मुरकुटे (बीड), डॉ.भारती धोकराट, साक्षी कामटेकर,नीता जाधव, रविंद्र पद्मे, (मुंबई),

प्रकाश सुभेदार, सलीमखान पठाण (लातूर), सुधीर बंडगर (सांगली), विजय देशमुख, अविनाश घुगे, शुभम औताडे, आकाश लकारे (अ नगर), रियाजोद्दीन शेख, चेतना चौधरी (नंदुरबार), संजय गायकवाड, ललिता पाटील, पंकज जाधव (सांगली), पूर्वा खेरकर,जगदीश वधाई (चंद्रपूर), डॉ राहूल काळोदे (नागपूर), दिलीप लांडकर (बुलडाणा), सुनील मोरे,सुरेश महाजन (जळगाव), हरेश पाटील, शितलकुमार शिंदे, निलेश जाधव (रायगड), निलेश बोडखे (अमरावती), कल्पना तप्पेकर, संदिप लंबे (कोल्हापूर), लता शिंदे (नाशिक), स्वाती कोंडे (सातारा), सुरेश पुजारी (ठाणे), गणेश काटकर (धुळे), अशोक गदादे आदी उपस्थित होते.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Leave a Comment