कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा दिवसभरातील अपडेट्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- जिल्ह्यात काल (गुरुवारी) सायंकाळपासून आज सायंकाळी ०६ वाजेपर्यंत  रुग्ण संख्येत १७ ने वाढ झाली. त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता १३०२ इतकी झाली असून एकूण रुग्ण संख्या २७८८ इतकी झाली आहे. 

आज ५३ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता १४३६ इतकी झाली आहे. दरम्यान, आता, जिल्हा रुग्णालय येथील कोरोना टेस्ट लॅबमध्ये आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढणार आहे.

सध्या असलेली प्रतिदिन ३०० चाचण्यांची क्षमता आता प्रतिदिन १ हजार अशी होणार आहे. त्यासाठी आवश्यक असणारे एक्स्ट्रॅक्टर उपलब्ध झाले असून सोमवार पासून अधिक चाचण्या होऊ शकणार आहेत.

याशिवाय, जिल्ह्यासाठी ५० हजार अँटीजेन किटसची मागणी नोंदविण्यात आली आहे. ते लवकरच प्राप्त होत असून मोठ्या प्रमाणात चाचण्या घेता येणार आहेत.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये संगमनेर तालुक्यातील घुले वाडी ०१, जोर्वे ०१, शहरातील अभंग मळा ०१ आणि अशोक चौक येथील एका रुग्णाचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ०३ जण बाधित आढळले. त्यात, श्रीरामपूर ०२ आणि राहाता येथील ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या १० रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, श्रीरामपूर ०१, संगमनेर ०७, मनपा ०१, राहाता ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • उपचार सुरू असलेले रुग्ण: १३०२
  • बरे झालेले रुग्ण: १४३६
  • मृत्यू: ५०
  • एकूण रुग्ण संख्या:२७८८
    • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

 

Leave a Comment