जिल्ह्यात कोरोनाचा कहर; लॉकडाऊन होणारा का ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. मुंबई, पुणे या मेट्रो सिटी पाठोपाठ आता अहमदनगर जिल्हाही कोरोनाच्या विळख्यात येऊ लागला आहे.

अनेक उपाययोजनांच्या नंतरही इलाख्यातील रुग्णसंख्या वाढताच आहे. ग्रामीण भागही आता कोरोनाने ग्रस्त झाला आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर जिल्ह्यात परिस्थिती अवघड होणार आहे.

ह्याच पार्श्वभूमीवर गुरूवारी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी तातडीने जिल्ह्यातील महसूल, आरोग्य आणि मनपाच्या अधिकार्‍यांची बैठक घेत कोरोना संसर्गाचा आतापर्यंतचा आढावा,

पुढील नियोजन आणि आवश्यक त्या सूचना दिल्या. दरम्यान, आज सकाळी पालकमंत्री हसन मुश्रीफ कोरोनाचा आढावा आणि उपाययोजना करण्यासाठी नगरला येणार आहेत.

जिल्ह्यातील करोना संसर्गाचा वाढता आलेख पाहून जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग चिंतेत आले आहे. याच पध्दतीने रुग्ण संख्या वाढत राहिल्यास अडचण होणार आहे.

यावर चर्चा करून मार्ग काढण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी गुरूवारी सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी,

सर्व तालुका आरोग्य अधिकारी आणि मनपा आरोग्य अधिकारी यांची बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारीणी विविध सूचना केल्या असून

उपस्थित अधिकार्‍यांकडून काही अभिप्राय जिल्हाधिकारी यांनी घेतले असून कोरोनापासून बचाव करण्यासाठी नागरिकांना आवाहन त्यांनी केले.

दरम्यान गेल्या आठवड्यात ऑनलाईन बैठकीनंतर आज पालकमंत्री हसन मुश्रीफ नगरला येत आहेत. जिल्ह्यातील करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासह अन्य उपाययोजनांबाबत ते प्रशासनासोबत चर्चा करणार आहेत.

पालकमंत्री हसन मुश्रीफ आजच्या दौर्‍यात नगर शहर आणि जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन काही दिवसांसाठी नगर शहर लॉकडाऊनची घोषणा करतात की काय याकडे सर्वांचे लक्ष आहे.

दरम्यान, यापूर्वी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी कोरोनाची परिस्थिती वेळेत रोखण्यासाठी लॉकडाऊन करणे गरजेचे असल्याचे

मत मांडून पालकमंत्र्यांच्या अट्टाहासामुळे जिल्ह्यात लॉकडाउन होत नसल्याचा आरोप केला होता. तसेच खा.डॉ.सुजय विखे यांनी एका पत्रकार परिषदेत एक डॉक्टर म्हणून माझे असे मत आहे की,

जिल्हा प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन पाच ते दहा दिवसांचा लॉकडाऊन करावा अशी मागणी केली होती. आता पालकमंत्री काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.

    • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

 

Leave a Comment