अहमदनगर मध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंचे अर्धशतक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- नगर शहर व जिल्ह्यात गुरुवारी जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोवीड प्रयोगशाळा, अँटीजेन चाचण्या आणि खासगी प्रयोगशाळेत मिळून १५१ रुग्ण आढळले.

आतापर्यंत जिल्ह्यात एकूण २७७१ रुग्ण आढळून आले असून वाटचाल ३ हजारांच्या टप्प्याकडे चालली आहे. गुरुवारी कोरोनाने दोघांचा बळी घेतला. त्यामुळे जिल्ह्यातील बळींची संख्या ५० झाली आहे.

जिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळेत ९० जणांचे अहवाल गुरूवारी बाधित आढळले. अँटीजेन चाचणीत ८ जण बाधित आढळले, तर खासगी प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह आढळलेल्या आणि आयसीएमआर पोर्टलवर ५३ रुग्णांची नोंद घेण्यात आली.

उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या १३३७ इतकी झाली असून, बरे झालेल्या रुग्णांची संख्या १३८४ आहे. जिल्ह्यात एकूण रुग्ण संख्या आता २७७१ इतकी झाली आहे. आतापर्यंत ५० जणांचा मृत्यू झाला आहे.

    • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Leave a Comment