पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले अहमदनगर जिल्ह्यात लॉकडाउन करण्याची गरज नाही !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात असल्याने येथे पुन्हा लॉकडाउन करण्याची गरज नाही अशी घोषणा आढावा बैठकीनंतर पालकमंत्री यांनी केली आहे.

परिस्थिती नियंत्रणात असली तरी नागरिकांनी काळजी घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.कोरोनाची परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचा निर्वाळा देत त्यांनी लॉकडाऊन लागू करण्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला.

नगरमध्ये करोनाचे रूग्ण वाढत असल्याने खा.डॉ.सुजय विखे सातत्याने शहरात लॉकडाऊन करण्याची मागणी करीत आहेत.

गुरुवारीही त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना पत्र देवून नगर शहर 5 दिवस लॉकडाऊन करण्याची मागणी केली होती. तातडीने निर्णय न घेतल्यास करोनाचा मोठा उद्रेक होण्याची भितीही खा.विखे यांनी व्यक्त केली आहे. मागील

जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ शुक्रवारी (दि.२४) नगर दौऱ्यावर आले होते.जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी ११ वाजता त्यांच्या उपस्थितीत कोरोना स्थितीबाबत महत्वाची आढावा बैठक झाली.

या बैठकीस पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोरोना बाबत बेठक घेतली यावेळी नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे ,जिल्हाधिकारी राहुल दिवेदी ,खा.सुजय विखे, आ. संग्राम जगताप, आ.निलेश लंके,

जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार , जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले ,जिल्हा शल्य चिकित्सक प्रदीप मुरंबीकर,जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ.संदीप सांगळे आदी उपस्थित होते.

    • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Leave a Comment