…अन्यथा श्रीरामपूर शहर पूर्ण बंद करा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :-मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. श्रीरामपूर तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे.

तालुक्यात काल पुन्हा नव्याने चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आता तालुक्यात 143 पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या झाली असून तालुक्यातील 90 अहवालाची प्रतिक्षा आहे.

शहरातील वॉर्ड नं. 2 मध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त असल्याने ही साखळी तोडण्यासाठी कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आला होता. परंतु त्यामुळे या ठिकाणी हातावर पोट भरणार्‍या कामगार आणि मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.

त्यामुळे वॉर्ड नं. 2 मधील कंटेन्मेंट झोनमधून वगळावे; अन्यथा श्रीरामपूर शहर बंद करण्यात यावे, अशी मागणी येथील नगरसेवकांनी तहसीलदार प्रशांत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी नगरसेवक मुजफ्फर शेख, राजेश अलघ, अंजूम शेख, राजेश अलघ, अंजूम शेख, रवींद्र गुलाटी, मुख्तार शहा यांच्यासह रईस जहागिरदार, कलूम कुरेशी, मुन्ना पठाण, साजिद मिर्झा,

अहमद जहागिरदार आदी उपस्थित होते. ह्या निवेदनात म्हटले आहे की, श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील वॉर्ड नं. 2 मधील कोरोना रुग्ण आढळून आल्यामुळे सदर भाग 23 जुलैपर्यंत कंटेनमेंट झोन काण्यात आला होता.

ज्या ठिकाणी रुग्ण निघाला तोच भाग सील करावा पूर्ण वॉर्ड नं. 2 ला वेठीस धरू नये, असे सांगत श्रीरामपूर शहर पूर्णपणे बंद करण्यात यावे अन्यथा वॉर्ड नं. 2 मध्ये कन्टेन्मेंट झोन रद्द करण्यात यावा असे म्हटले आहे.

    • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Leave a Comment