ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ व साहित्यिक अ‍ॅड. भास्करराव आव्हाड यांचे कोरोनामुळे निधन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ व साहित्यिक अ‍ॅड. भास्करराव आव्हाड यांचे निधन झाले आहे. ते 75 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. आव्हाड यांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. 

त्यांच्या मागे मुलगा अ‍ॅड. अविनाश आव्हाड, मुलगी, पत्नी असा परिवार आहे. भास्करराव आव्हाड यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील चिचोंडी (शिराळ) या गावातील शेतकरी कुटुंबात झाला होता.

आव्हाड यांची ओळख पुण्यात विधी महाविद्यालयात गावाकडून शिकण्यास येणाऱ्या ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थ्यांचे ते आधारवड, मार्गदर्शक व आधारस्तंभ म्हणून होती.

पुण्यातील बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयातून बी. कॉम पदवी प्राप्त केली. त्यानंतर विधि महाविद्यालयातून एलएल.बी व पुणे विद्यापीठातून एलएल.एम या पदव्या विद्यापीठात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते.

त्यानंतर पुण्यातच कायद्याचे प्राध्यापक म्हणून ते कार्य सुरु केले. वकिली व्यवसायही सुरु केला. त्यांनी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातही प्रकरणे चालवली.

राज्यातील शेकडो न्यायाधीश तयार करण्यात तसेच वकिलांना मार्गदर्शन करण्यात त्यांचे मोलाचे योगदान होते. अनेक वृत्तपत्रांत त्यांचे वैशिष्ठयपूर्ण लेख प्रकाशित झाले होते. मुंबई उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात त्यांचे अनेक खटले महत्वपूर्ण ठरले होते.

लॉकडाऊनदरम्यान त्यांनी हजारो वकिलांना ऑनलाईन मार्गदर्शन केले. त्यांच्या निधनाने विधी क्षेत्रातील दिग्गज हरपला, अशीच प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केले.

आव्हाड यांनी वैदिक न्याय शास्त्र हा ग्रंथ लिहिला. तसेच कायद्याच्या विद्यार्थ्यांसाठी व वकिलांसाठी अनेक पुस्तके लिहिली. त्यांचे मरुद्यान व उद्यानविश्व हे दोन कविता संग्रह प्रसिद्ध झाले.

त्यांनी युरोप दौऱ्यावरचे क्षितीजापार, अमेरिकेच्या दौऱ्यावरचे कोलंबसाचा मागोवा आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरचे शोध कांगारुंचा ही तीन प्रवासवर्णनेही लिहिली आहेत.

    • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Leave a Comment