जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणी कोरोनाचा विस्फोट दोन दिवसात आढळले १८ जण बाधित !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :- कर्जत तालुक्यात कोरोनाचा विस्फोट झाला आहे.दोन दिवसात तब्बल १८ कोरोनाचे रुग्ण सापडले असून तालुक्यात कोरोनाने अर्धशतक गाठले आहे.

कोरोनाचा कहर सर्वत्र वाढू लागला असून कर्जत तालुक्याला ही त्यातून सुटका मिळालेली नाही.तालुक्यात कोरोनाने अर्धशतक गाठले असून दि.२५ जुलै रोजी १२ तर दि २६ जुलै रोजी ६ रुग्ण आढळले आहेत.

यामध्ये राशीन ६, मिरजगाव २, निंबोडी १, थेरवडी १, बेलगाव १, पिंपळवाडी १, हे सर्व दि.२५ जुलै रोजी तर दि.२६ जुलै रोजी राशीन २, परीटवाडी ३, व थेरवडीमध्ये १ रुग्ण आढळला आहे.

यामुळे कर्जत तालुक्यात ५० कोरोना रुग्ण झाले असून, यातील ग्रामीण भागात ४४ रुग्ण असून कर्जत शहरातील ६ रुग्ण आहेत. तालुक्यातील सोळा रुग्ण बरे झाले आहेत तर चार व्यक्तींचे मात्र कोरोनाने निधन झाले आहे,

सध्या तालुक्यात ३० रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. आज अखेर तालुक्यातील ३१९ लोकांचे स्वॅब घेण्यात आलेले असून, यातील २९७ लोकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत.

एकूण कन्टेन्मेंट झोन ४२ असून या पैकी कर्जत शहरात ५ तर कर्जत ग्रामीण भागात ३७ आहेत. यामध्ये राशीन मिरजगाव, निंबोडी, थेरवडी,परीटवाडी, पिंपळवाडी, बेलगाव आदी गावाचा समावेश आहे. अशी माहिती तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी दिली.\

    • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Leave a Comment