युवानेता, व्यापारी आणि शेतकरी कुटुंबांना कोरोनाने घेरले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :- मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. श्रीरामपूर तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे.

तालुक्यात पुन्हा नव्याने राष्ट्रवादीचे माजी जिल्हा पदाधिकारी व त्यांच्या कुटुंबातील पाच जणांसह श्रीरामपूर शहर व तालुक्यात 23 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असून

आता तालुक्यात पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 165 झाली आहे. अद्याप 91 अहवालाची प्रतिक्षा आहे. राष्ट्रवादीचे माजी जिल्हा पदाधिकारी यांच्यासह माजी नगरसेविका असलेली त्यांची पत्नी,

मुलगी, भाऊ व भावजई असे पाच जणांचा रॅपीड टेस्टमध्ये कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. भळगट हॉस्पिटलच्या मागे राहत असलेले एक व्यापारी, अशोकनगर राऊत वस्तीवरील एकाच कुटुंबातील तीन जण,

बेलापूर, फत्याबाद, व पढेगाव येथील प्रत्येकी 1 अशा 12 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या युवा नेत्याने परवा एका वाढदिवसाला हजेरी लावली होती.

त्यांच्या सोबत सहकारी संस्थेच्या पदाधिकार्‍यांसह इतर काही राजकीय मंडळी होती. त्यापैकी काहींनी काल स्वतःहून आपले स्त्राव तपासणीसाठी दिले असून आज त्यांचा अहवाल मिळण्याची शक्यता आहे.

तसेच बेलापूर बुद्रुक येथील पाण्याच्या टाकी परिसरातील एकाच घरातील 4, बेलापूर खुर्द येथील केशव गोविंद बन रस्त्यावरील एकाच घरातील 3, दशमेशनगर येथील एकाच घरातील चार जण पॉझिटिव्ह आल्याने एकत्रित २३ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

    • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Leave a Comment