अतिवृष्टीचा अनेक गावांना फटका ,लाखोंचे नुकसान

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :- कोरोना महामारीने शेतकऱ्यांना कोलमडून टाकले आहे. त्यानंतर सोयाबीन बियाणांमध्ये झालेली फसवणूक, शेम्बडी गोगलगायीचे संकट आदी नैसर्गिक संकटांनी शेतकरी आणखी कोलमडला.

परंतु त्याच्या पाठीशी लागलेले शुक्लकाष्ट संपण्याचे नाव घेत नाही. आता जोरदार पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. कोपरगाव शहरासह तालुक्याला सलग दोन दिवस मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले.

या अतिवृष्टीचा अनेक गावांना फटका बसला आहे. पावसाने कुठे शेतात पाणी साचले तर कुठे बाजरी पीक भूईसपाट झाले. परिसरातील बाजरी, भुईमूग, मका, ऊस, जनावरांचा चारा आदी पिकांमध्ये पाणी साचले.

बळीराजाचे लाखों रुपयांचे नुकसान झाले असून सरकारने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी होत आहे. शिंगणापूर, खर्डी गणेश, पोहेगाव, सोनेवाडी, मढी बु., चांदेकसारे, देर्डे चांदवड, देर्डे कोर्‍हाळे, हंडेवाडी, कारवाडी, वेळापूर,

सुरेगाव, कोळपेवाडी, कोळगाव थडी, माहेगाव देशमुख, कुंभारी, हिंगणी, रांजणगाव देशमुख, अंजनापूर, डाऊच, धारणगाव आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेती पिकाबरोबरच घरात पाणी घुसून पडझड झाली तर विहिरींचेही नुकसान झाले.

    • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Leave a Comment