पोस्टाच्या ‘ह्या’ योजनेचा ३१ जुलैपर्यंत घ्या लाभ आणि मिळवा खूप सारा फायदा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :-  कोरोनव्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने मार्चच्या उत्तरार्धात लॉकडाऊन केले.आवश्यक कामेही पूर्ण बंद केली गेली. 

त्यामध्ये गुंतवणूकीशी संबंधित बाबींचा समावेशही आहे. याच पार्श्वभूमीवर सुकन्या समृद्धि योजना खाती उघडण्यासाठी सरकारने एक खास सुविधा सुरू केली.

जुलैच्या पहिल्या आठवड्यात पोस्ट विभागाने असे सांगितले होते की लॉकडाऊन दरम्यान (25 मार्च ते 30 जून 2020 पर्यंत) दहा वर्षांच्या मुलींसाठी एसएसवाय खाती 31 जुलैपर्यंत उघडता येतील.

नियमानुसार किमान दहा वर्षांच्या मुलीचे एसएसवाय खाते उघडले जाऊ शकते. तथापि, लॉकडाऊन दरम्यान, अनेक पालकांना आपल्या मुलीचे एसएसवाय खाते उघडणे शक्य नव्हते.

हे लक्षात घेता सरकारने हा दिलासा दिला. ही सुविधा केवळ 31 जुलैपर्यंत मिळू शकते. * ७.६ टक्के व्याजदर सुकन्या समृद्धि योजनेत सध्या ७.६ टक्के दराने व्याज मिळत आहे.

या योजनेत खाते उघडताना जो व्याज दर राहील, त्याच दराने संपूर्ण गुंतवणूकीच्या कालावधीत व्याज मिळते. पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंट यासह सर्व लहान बचत योजनांमध्ये केलेल्या गुंतवणूकीवर सरकारने जुलै-सप्टेंबरच्या तिमाहीत व्याज दरात बदल केलेला नाही.

ही कागदपत्रे लागतील – – मुलीच्या जन्माचे  प्रमाण पत्र – पालकांचा पत्ता पुरावा, त्यासाठी पासपोर्ट, रेशनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, विजेचे बिल दिले जाऊ शकते –

आईडी प्रूफसाठी पॅन, आधार किंवा पासपोर्ट – २५० रु. भरून या योजनेस प्रारंभ करू शकता  इनकम टॅक्स मध्येही मिळेल दिलासा इनकम टॅक्स डिपार्टमेंटनेही विविध आयटी कायद्यांसाठी गुंतवणूकीची मुदत 31 जुलैपर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती.

यानंतर अशा गुंतवणूकदारास अशी संधी देखील मिळू शकते की तो सन 2019—20 या आर्थिक वर्षासाठी आयकर कायद्याच्या कलम80C, 80D (मेडिक्लेम), 80G (डोनेशन) ई अंतर्गत गुंतवणूक करू शकेल.

    • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Leave a Comment