रीडिंग न घेताच ग्राहकांना नेहमीपेक्षा दुप्पट व चारपट जादा वीजबिल !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- कोरोनाच्या काळामध्ये लॉकडाऊनमध्ये अनेकांची वीजबिले भरायची राहिल्याने आणि आता अवाजवी बिल आल्यामुळे लोकांमध्ये असंतोष पसरला आहे.

शिर्डी शहरातही महावितरण कंपनीने रीडिंग न घेताच ग्राहकांना नेहमीपेक्षा जास्त वीजबिल आकारले असून या वीज बिलाचा चांगलाच झटका ग्राहकांना बसला आहे.

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रमेश गोंदकर यांनी ऊर्जा मंत्री प्राजक्त तनपुरे यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन असल्याने शिर्डी शहरातील लहान-मोठे व्यावसायिक व्यापारी,

दुकाने, शहरातील हॉटेल लॉज, उपाहारगृहे पूर्णतः बंद आहेत. बंद असलेल्या व्यवसायांचे अवास्तव बिल ग्राहकांच्या माथी मारण्यात आले आहे. वहन आकार म्हणून 1 रुपये 18 पैसे नवीन बिलात समाविष्ट करण्यात आले आहे.

कोरोनाच्या साथीमुळे सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. इतर ठिकाणांप्रमाणेच शिर्डीतील व्यवहार कडेकोट बंद असून सर्वसामान्य माणूस घरात बसून आहे.

त्याची अवस्था अतिशय हलाखीची झाली आहे. त्यामुळे हा प्रश्न सामान्य माणसाला भेडसावत असताना सरासरीने काढलेली वीजबिल पाहून त्यांची अवस्था बिकट झाली आहे.

अवास्तव वाढीव बिलांची रक्कम कमी करावी तसेच सदर बिले भरण्यासाठी मुदतवाढ मिळावी, वीजबिलाचे हप्ते पाडून भरण्याची सवलत देण्यात यावी, अशी मागणी तनपुरे यांच्याकडे करण्यात आली.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Leave a Comment