मृत्यू झाला सर्पदंशाने घाेषित केले कोरोनामुळे….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :- अकोले तालुक्यातील कोतूळ ग्रामीण रुग्णालयात १० जून रोजी उपचारासाठी दाखल अनन्या विश्वास शिंदे (वय ५) हिला सर्पदंश झालेला असताना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्याने तिला कोरोना रुग्ण म्हणून घोषित केले.

वेळेवर उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला. सर्पदंश झालेला असतानाही कोरोना बाधित घोषित केले. या प्रकरणाच्या फेर चौकशीसाठी समिती नियुक्त करून कोतूळ

येथील ग्रामीण रुग्णालयातील दोषी डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गवांदे यांनी केली.

याबाबत गवांदे यांनी मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, सामाजिक न्यायमंत्री, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, जिल्हाधिकारी यांना निवेदन पाठवले.

शिंदे परिवाराला न्याय मिळाला नाही, तर जनआंदोलन उभारले जाईल, असा इशारा राज्य सचिव विजय वाकचौरे, राज्य संघटक सुरेश देठे, जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव, गौतम पवार,

सचिन खरात, किशोर शिंदे, प्रवीण देठे, सावळेराम गायकवाड, कमलेश कसबे, संदीप शिंदे, शंकर संगारे, शंकर जगधने आदींनी दिला. गुन्हा दाखल करण्याची अारपीअायची मागणी

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Leave a Comment