संतापजनक : पीपीई किट व मास्क थेट नदीपात्रात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :- जिल्ह्यात कोरोना संकट वाढत असतानाच अहमदनगर जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वापरलेले पीपीई कीट, मास्क नदीपात्रात सोडल्याची माहिती समोर आली आहे.

संगमनेर तालुक्यात वापरलेले पीपीई किट आणि औषधे प्रवरा नदीपात्रात उघड्यावर टाकल्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

यातून कोरोनाचा फैलाव झाल्यास जबाबदार कोण, अशी विचारणा स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे. राज्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे.

दररोज हजारो कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत असे असताना ज्याठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतात, त्याच ठिकाणी या वस्तू पडल्या आहेत.

त्यामुळे असल्याने नागरिकही धास्तावले आहेत. कोरोनाबाधित मृत व्यक्तीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातात त्याचठिकाणी वापरलेले अनेक पीपीई कीट आणि औषधे उघड्यावर फेकण्यात आली आहेत.

संगमनेर शहरातून वाहणाऱ्या प्रवरा नदीपात्रातील जुन्या पुलाजवळ हा सर्व गोळ्या औषधासह वापरलेल्या पीपीई कीटचा साठा सापडला आहे.

कोरोनाबाधित रूग्णाच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कार केले जातात आणि याच ठिकाणच्या जवळच या सर्व वस्तू नदीपात्रात फेकल्या जात आहेत.

दरम्यान, या वस्तू नेमक्या कोणत्या हॉस्पिटलमधून येथे फेकल्या गेल्या, याबाबत कोणतीही माहिती सध्या तरी प्रशासनाकडे नाही. मात्र,

सदर प्रकार अतिशय गंभीर असून अशा प्रकारे वस्तू फेकणे अत्यंत धोकादायक आहे. जर या वस्तू कोरोनाबाधित रूग्णालयातील असतील तर इतरांनाही यापासून धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Leave a Comment